चेन्नई सुपर किंग्सच्या संघासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. कारण चेन्नईच्या संघात एक खेळाडू पुन्हा एकदा दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चेन्नईच्या संघाची एक चिंता संपलेली पाहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला होता. या सामन्यानंतर चेन्नईच्या संघासाठी एक वाईट बातमी आली होती. चेन्नईचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्राव्हो दोन सामन्यांना मुकणार असल्याचे समजले होते. पण आज सोमवारी चेन्नईच्या संघासाठी एक आनंदाची बातमी आलेली असून तो खेळाडू पुन्हा एकदा संघात दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सध्याच्या घडीला चेन्नईचे तीन खेळाडू संघाबाहेर होते. चेन्नईच्या संघात करोना व्हायरस पसरल्यामुळे सुरेश रैनाने युएई सोडून मायदेशात येणे पसंत केले होते. त्यानंतर हरभजन सिंगनेही आयपीएल खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोघांना करोना झाल्यामुळे त्यांना संघापासून लांब ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी चहर फिट झाला होता आणि त्यानंतर तो पहिल्या सामन्यात खेळलाही होता. पण ऋतुराज मात्र जास्त काळ क्वारंटाइनमध्ये होता.

चेन्नईच्या संघाने आज एक ट्विट करून आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. चेन्नईच्या संघाने ट्विटकरून सांगितले की, करोना झालेला ऋतुराज हा पूर्णपणे फिट झाला आहे. त्याची करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे आता ऋतुराज संघात दाखल झाला असून त्याने संघाबरोबर सराव करायला सुरुवातही केली आहे. ऋतुराजला चेन्नईच्या पहिल्या सामन्यात खेळता आले नव्हते. पण ऋतुराजने आता सराव सुरु केला आहे. त्यामुळे त्याला आता खेळण्याची संधी कधी मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

चहर आणि ऋतुराज यांना एकाचवेळी करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर चहर हा लवकर करोनामधून बाहेर पडला. पण ऋतुराजची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्याला क्वारंटाइनमध्येच राहावे लागले होते. पण आता ऋतुराजची करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे ऋतुराज लवकरच मैदानात खेळताना दिसेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here