विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने देवदत्त पडीक्कल या युवा धडाकेबाज फलंदाजाला स्थान दिल्याचे पाहायला मिळत आहे. देवदत्तने आपल्या संघाला झोकात सुरुवात करून दिल्याचेही पाहिले गेले आहे. देवत्तने आपल्या पहिल्याच सामन्यात धडेकबाज फलंदाजी करत हैदराबादच्या गोलंदाजीवर कडक प्रहार केल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंतच्या स्थानिक सामन्यांमध्ये देवदत्तकडून चमकदार कामगिरी पाहायला मिळाली होती.
कोहलीच्या आरसीबीने यावेळी यष्टीरक्षक जोश फिलीपला पदार्पणाची संधी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. देवदत्त आणि जोश हे दोघेही २० वर्षांचे आहेत. देवदत्तने आपली निवड सार्थ असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता जोश कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलेले आहे.
हैदराबादच्या संघानेही यावेळी एका युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिलेली आहे. हैदराबादने आजच्या सामन्यात प्रियम गर्ग या युवा खेळाडूला पहिल्यांदाच संधी दिली आहे. गर्गचा हा आयपीएलचा पहिलाच सामना असणार आहे. गर्ग हा भारताच्या १९ वर्षांखालील युवा संघाचा कर्णधार होता. गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण भारतीय संघाला त्यावेळी विजेतेपद पटकावता आले नव्हते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times