विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पहिल्याच सामन्यात आरसीबीने हैदराबादपुढे विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे. सलामीवीर देवदत्त पडीक्कल आणि एबी डी व्हिलियर्स या दोघांची अर्धशतके यावेळी पाहाला मिळाली.

हैदराबादने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. पण त्यांचा हा निर्णय आरसीबीचा युवा सलामीवीर देवदत्त पलीक्कडने चुकीचा असल्याचे दाखवून दिले. आपल्याच पहिल्याच सामन्यात देवदत्तने अर्धशतक झळकावत आपली निवड कशी योग्य आहे, हे दाखवून दिले. देवदत्तने पदार्पणाच्या सामन्यात ४२ चेंडूंत आठ चौकारांच्या जोरावर ५६ धावांची दमदार खेळी साकारली. त्याला दुसऱ्या टोकाकडून आरोन फिंचनेही चांगली साथ दिली. देवदत्त आणि फिंच या दोघांनी मिळून आरसीबीला ९० धावांची सलामी दिली.

देवदत्त आणि फिंच हे दोघेही लागोपाठच्या षटकात बाद झाले आणि कर्णधार कोहली मैदानात आला. कोहलीबरोबर आरसीबीचा हुकमी फलंदाज एबी डी व्हिलियर्सही यांनी सावधपणे फलंदाजीला सुरुवात केली. पण कोहलीला यावेळी जास्त धावा करता आल्या नाहीत. कोहलीला १३ चेंडूं १४ धावाच करता आल्या. कोहलीला नटराजनने रशिद खानकरवी झेलबाद केले. कोहली बाद झाल्यावर संघाची सर्व जबाबदारी डी व्हिलियर्सवर आली होती.

डी व्हिलियर्सने स्थिरस्थावर झाल्यावर आपली तुफानी फलंदाजी करायला सुरुवात केली. संदीप शर्माच्या एकाच षटकात दोन षटकार लगावत डी व्हिलियर्सने आपले इरादे स्पष्ट केले आणि त्यानंतर अर्धशतकही पूर्ण केले.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या संघाने देवदत्त पडीक्कल या युवा धडाकेबाज फलंदाजाला स्थान दिल्याचे पाहायला मिळत आहे. देवदत्तने आपल्या संघाला झोकात सुरुवात करून दिल्याचेही पाहिले गेले आहे. देवत्तने आपल्या पहिल्याच सामन्यात धडेकबाज फलंदाजी करत हैदराबादच्या गोलंदाजीवर कडक प्रहार केल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंतच्या स्थानिक सामन्यांमध्ये देवदत्तकडून चमकदार कामगिरी पाहायला मिळाली होती.

कोहलीच्या आरसीबीने यावेळी यष्टीरक्षक जोश फिलीपला पदार्पणाची संधी दिल्याचे पाहायला मिळाले आहे. देवदत्त आणि जोश हे दोघेही २० वर्षांचे आहेत. देवदत्तने आपली निवड सार्थ असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे आता जोश कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलेले आहे.

हैदराबादच्या संघानेही यावेळी एका युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिलेली आहे. हैदराबादने आजच्या सामन्यात प्रियम गर्ग या युवा खेळाडूला पहिल्यांदाच संधी दिली आहे. गर्गचा हा आयपीएलचा पहिलाच सामना असणार आहे. गर्ग हा भारताच्या १९ वर्षांखालील युवा संघाचा कर्णधार होता. गर्गच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण भारतीय संघाला त्यावेळी विजेतेपद पटकावता आले नव्हते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here