विराट आणि अनुष्का यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या घरी पाळणा हलणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यानंतर विराट आणि अनुष्काने आरसीबीच्या संघाला युएईमध्ये एक जंगी पार्टीही दिली होती. पण त्यानंतर पहिल्यांदाच अनुष्काचा फोटो व्हायरल झालेला पाहायला मिळाला आहे.
अनुष्का आरसीबीच्या सामन्यापूर्वी युएईतील हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये उतरली होती. यावेळी आपल्या स्विमिंग सूटमधला हॉट फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा फोटो चाहत्यांनी चांगलाच व्हायरल केल्याचे पाहायला मिळत आहे.
या फोटोखाली अनुष्काने चाहत्यांसाठी काही ओळी लिहिल्या आहेत. अनुष्काने लिहिले आहे की, ” जगातील चांगल्या गोष्टींवर ज्यांनी मला विश्वास दाखवण्यासाठी प्रेरणा दिली, त्या सर्वांचे आभार. मीदेखील हा संदेश जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, असा प्रयत्न करत आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times