वाचा-
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून सहा वर्षांनी एखाद्या फलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. याआधी युवराज सिंगने २०१४ साली RCBकडून नाबाद ५२ धावा केल्या होत्या. पण देवदत्तची गोष्टी आणखी स्पेशल आहे. त्याचे आणि पदार्पणातील सामन्यात ५० धावा करण्याचे एक अनोखे कनेक्शन आहे.
वाचा-
याआधी देवदत्तने प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी-२० या सर्व प्रकारातील पदार्पणाच्या सामन्यात अर्थशतक झळकावले आहे. देवदत्तने २०१८ साली रणजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या विरोधात प्रथम श्रेणी सामन्यातील ७ आणि ७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१९ साली लिस्ट ए (विजय हजारे ट्रॉफी) मध्ये झारखंडविरुद्ध ५८ धावा केल्या. त्याच वर्षी सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने उत्तराखंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात नाबाद ५३ धावांची खेळी केली. क्रिकेटमधील चारही प्रकारात पदार्पण करणारा तो पहिला फलंदाज आहे.
वाचा-
देवदत्त पडीक्कलने २०१९-२० मध्ये विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ डावात ६७.६६च्या सरासरीने ६०९ धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत त्याचा स्ट्राइक रेट ८१.०९ इतका होता. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी २०१९-२० मध्ये देखील त्याने १२ सामन्यात ६४.४४च्या सरासरीने ५८० धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि ५ अर्थशतकांचा समावेश होता. या स्पर्धेत त्याचा स्ट्राइक रेट १७५.७५ होता.
वाचा-
काल सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात देवदत्त आणि ऑरॉन फिंच यांनी RCBला धडाकेबाज सुरूवात करून दिली होती. स्पर्धेत या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी अशीच कामगिरी केली तर विराट कोहलीचे पहिल्या आयपीएल विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.
RCBकडून पदार्पणाच्या सामन्यात ५० हून अधिक धावा करणारे
ख्रिस गेल- १०२ नाबाद (२०११)
देवदत्त पडीक्कल- ५६ (२०२०)
एबी डिव्हिलियर्स- ५४ नाबाद (२०११)
युवराज सिंग- ५२ नाबाद (२०१४)
एस गोवस्वामी- ५२ (२००८)
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times