शारजा: IPL 2020च्या मध्ये पहिल्या सामन्यात गत विजेत्या मुंबई इंडियन्सवर विजय मिळवणाऱ्या संघाचा आज दुसरा सामना राजस्थान रॉयल्स () संघाविरुद्ध होणार आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई संघाचा दुसऱ्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. तर स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा हा पहिला सामना आहे.

वाचा-
मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईची कामगिरी चांगली झाली असली तरी धोनीने नंतर अनेक बाबतीत सुधारणा आवश्यक असल्याचे म्हटले होते. या सामन्यात चेन्नईकडून नेमके हेच अपेक्षित आहे. पहिल्या सामन्यात संघ अडचणीत आला असताना अंबाती रायडू (७१) आणि फाफ डुप्लेसिस (५८) चेन्नईला विजयपथावर आणले.

वाचा-
मुंबई विरुद्धच्या सामन्यात धोनीने माइंड गेम खेळला. गोलंदाजी असो की फलंदाजी धोनी नेतृत्व दाखवून दिले. यामुळे धोनीमुळे मुंबईला मोठी धावसंख्या करता आली नाही. नंतर फलंदाजीच्यावेळी रविंद्र जडेजा आणि सॅम करन यांना वरच्या स्थानावर पाठवून धोनीने सामना फिरवला.

वाचा-
चेन्नईसाठी पियूष चावला हा महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो. त्याने मुंबई विरुद्ध ४ षटकात फक्त २१ धावा देल्या होत्या आणि एक विकेट घेतली. त्याच बरोबर लुंगी गिडी, रविंद्र जडेजा, दीपक चाहर हे देखील गोलंदाजीची ताकद आहेत.

राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर मात्र त्यांना कधीच शानदार कामगिरी करता आली नाही. या वर्षी राजस्थानकडे काही स्टार खेळाडू आहेत. ज्यात कर्णधार स्मिथसह रॉबिन उथप्पा, श्रेयस गोपाळ, वरून अॅरॉन यांचा समावेश आहे. तर यशस्वी जयसवाल, रियान पराग आणि कार्तिक त्यागी हे युवा खेळाडू आहेत.

वाचा-
पहिल्या सामन्यासाठी बेन स्टोक्स उपलब्ध असणार नाही. हीच बाब चेन्नईला देखील लागू होते. दुखपतीमुळे ब्राव्हो देखील या सामन्यात उपलब्ध असणार नाही.

आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ २१ वेळा लढले आहेत. त्यापैकी १४ वेळा चेन्नईने विजय मिळवला तर ७ वेळा राजस्थानने बाजी मारली आहे. शारजा मैदानावर होणारा हा पहिला सामना आहे. त्यामुळे सर्वंची उत्सुकता वाढली आहे. संध्याकाळी ७ वाजता नाणेफेक होईल तर साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here