नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज () ने आयपीएलच्या १३व्या हंगामाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे केली आहे. सनरायजर्स हैदारबाद विरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात एबीने २९ चेंडूत अर्धशतक केले. या सामन्यात त्याने ३० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या.

वाचा-
RCBला आणि ऑरॉन फिंच यांनी दमदार सुरुवात करून दिल्यानंतर विराट कोहली लवकर बाद झाला. त्यानंतर एबीने सूत्रे हातात घेतली आणि पहिल्या सामन्यात आक्रमक खेळी काय असते हे दाखवून दिले. या सामन्यात पहिला षटकार मारताच त्याने बेंगळुरूकडून २०० षटकार मारण्याचा टप्पा पार केला. एबी २००८ पासून RCBकडून खेळतो. त्याने १५५ सामन्यात २१४ षटकार मारले आहेत. त्यापैकी २००८ ते २०१० दिल्लीकडून १३ षटकार मारले होते. आता RCBकडून त्याचे २०१ षटकार झाले आहेत.

वाचा-
हैदराबादविरुद्ध १२व्या षटकात तो खेळण्यास आला. संघाने २ बाद ९० धावा केल्या होत्या. विराट आणि एबीची जोडी जमणार असे वाटले होते तेव्हा कोहली १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर RCBच्या धावसंख्येचा वेग कमी झाला. १६ षटकात ३ बाद १२४ वर असताना एबीने १९व्या षटकात दोन षटकार मारले.

वाचा-

४०० षटकारांची संधी हुकली
या सामन्यात जर एबीने आणखी एक षटकार मारला असता तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याचे ४०० षटकार पूर्ण झाले असते. एबीचे टी-२०मध्ये आता ३९९ षटकार झाले आहेत.

वाचा-
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने ४०४ सामन्यात ९७८ षटकार मारले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड आहे. त्याने ६७३ षटकार मारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ब्रॅडन मॅकलम असून त्याने ४८५, तर शेन वॉटसन ४५४ षटकारांसह चौथ्या स्थानावर आहे. आंद्रे रसेलने ४४१ षटकार मारले आहेत. तर एबी या यादीत सहाव्या स्थानावर आहे.

आयपीएलमधील सर्वाधिक षटकारांचा विचार केल्यास गेल अव्वल स्थानी आहे. त्याने ३२६ षटकार मारले आहेत. एबी २१४ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीने २०९ षटकार मारले आहेत. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा १९४ षटकारांसह चौथ्या तर सुरेश रैना इतक्याच षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here