वाचा-
आयपीएलचे गतविजेते आणि उपविजेते असलेल्या या दोन्ही संघातील पहिला सामना २० कोटींहून अधिक प्रेक्षकांनी टीव्हीवर पाहिला. बीसीसीआयचे सचिव यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली.
वाचा-
शहा यांनी BARC इंडिया (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल, इंडिया)च्या रेटिंगचा हवाला देत, क्रिकेट चाहत्यांना ही माहिती दिली.
वाचा-
मंगळवारी शहा यांनी ट्विटवरून सांगितले की, ड्रीम ११ आयपीएलमधील सलामीच्या सामन्याने नवा विक्रम केला आहे. BARC इंडियानुसार हा सामना २० कोटीहून अधिक प्रेक्षकांनी पाहिला. देशातील कोणत्याही लीग स्पर्धेच्या उद्घाटनाचा पहिला सामना इतक्या मोठ्या प्रमाणात पाहिला गेला नाही. आतापर्यंत कोणत्याही लीग स्पर्धेतील पहिल्या मॅचसाठी इतके प्रेक्षक मिळाले नव्हते.
वाचा-
वाचा-
आतापर्यंत आयपीएलमध्ये ३ सामने झाले असून आज चौथा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. चेन्नईचा हा दुसरा सामना, तर राजस्थानचा पहिला सामना आहे. चेन्नईने पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई संघाचा पाच विकेटनी पराभव केला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times