नवी दिल्ली: सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १० धावांनी विजय मिळवला. बेंगळुरूच्या या विजयात युजवेंद्र चहलची महत्त्वाची भूमिका ठरली. त्याने ४ षटकात १८ धावात ३ विकेट घेतल्या.

वाचा-
हैदराबादच्या डावात १६व्या षटकात विराटने चेंडू चहलच्या हातात दिला. या एका ओव्हरने सामन्याचा निकाल बदलला. १५ षटकात हैदराबादने २ बाद १२१ धावा केल्या होत्या. हैदराबादची सामन्यावर पकड होती. पण १६व्या षटकात चहलने सलग दोन विकेट घेतल्या आणि सामन्याचा निकाल बदलला.

वाचा-
विजय मिळवल्यानंतर चहल म्हणाला, मी पहिली ओव्हर टाकली तेव्हा लक्षात आले की मला विकेटवर चेंडू टाकायचा आहे. हैदराबादचे खेळाडू चांगली फलंदाजी करत होते.

वाचा-

वाचा-
बेयरस्टोला मी फुल लेंथ चेंडू विकेटच्या बाहेर ठेवला. तर विजयच्या वेळी मला विराट आणि एबीने गुगली टाकण्यास सांगितले. यामुळे यश मिळाले. मी हाताला थोडी माती लावली होती त्यामुळे चेंडू निसटला नाही.

व्हिडिओ पाहण्यासाठी करा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here