नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या सामन्यात अंबाती रायडू, दुसऱ्या सामन्यात मयांक अग्रवाल आणि तिसऱ्या सामन्यात () यांनी धमाकेदार बॅटिंग केली. या तिन्ही खेळाडूंमध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती फार ओळख नसलेल्या देवदत्त पडिक्कल या कर्नाटकाकडून खेळणाऱ्या केरळच्या खेळाडूची…

वाचा-
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या बेंगळुरू संघाने सलामीवीर म्हणून ऑरोन फिंच आणि युवा खेळाडू देवदत्तला संधी दिली. आतापर्यंत संघाचा कर्णधार सलामीला येत असे. पण विराटने यावर्षी देवदत्तला संधी दिली. विराट आणि फिंच ही जोडी नक्कीच चांगली ठरली असती. पण विराटने देवदत्तला संधी दिली. या मागे देवदत्तची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी कारणीभूत ठरलीय.

वाचा-
भारताच्या महान खेळाडूंनी आतापर्यंत हे सिद्ध करून दाखवले आहे की त्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याचे त्यांनी सोनं केले. देवदत्तने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचे सोने केले. आता आयपीएलमधील सामन्यात देखील त्याने स्वत:ची क्षमता दखवून दिली.

देवदत्तची आई पंबीनी पडिक्कल यांनी आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माआधीच ठरवले होते की, जर मुलगा झाला तर त्याला क्रिकेटपटू करायचे आणि तसेच झाले. केरळमध्ये जन्मलेल्या २००० साली जन्मलेल्या देवदत्तने काल आयपीएलमध्ये पदार्पण केले.

वाचा-
देवदत्त केरळचा असला तरी तो कर्नाटककडून खेळतो. कर्नाटकमधील KPL लीग स्पर्धेत त्यांना शानदार कामगिरी केली आहे. येथील युवा खेळाडूंसाठीच्या टॅलेंट हंट मधून देवदत्त सारखा खेळाडू मिळाला आहे. विराटने आतापर्यंत आयपीएलमध्ये केलेली शतकी खेळी ही सलामीला येवून केली आहे. पण यावेळी त्याने स्वत:ला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आणि देवदत्तला संधी दिली. यावरून विराटचा त्याच्यावर किती विश्वास आहे हे दिसून येते.

देवदत्तने पहिल्या सामन्यात ५६ धावांची खेळी करत एक वेगळा विक्रम देखील केला. त्याने ४२ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. या खेळीसह तो एका खास क्लबमध्ये दाखल झाला आहे.

वाचा-
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून सहा वर्षांनी एखाद्या फलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. याआधी युवराज सिंगने २०१४ साली RCBकडून नाबाद ५२ धावा केल्या होत्या. पण देवदत्तची गोष्टी आणखी स्पेशल आहे. त्याचे आणि पदार्पणातील सामन्यात ५० धावा करण्याचे एक अनोखे कनेक्शन आहे.

याआधी देवदत्तने प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी-२० या सर्व प्रकारातील पदार्पणाच्या सामन्यात अर्थशतक झळकावले आहे. देवदत्तने २०१८ साली रणजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या विरोधात प्रथम श्रेणी सामन्यातील ७ आणि ७७ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०१९ साली लिस्ट ए (विजय हजारे ट्रॉफी) मध्ये झारखंडविरुद्ध ५८ धावा केल्या. त्याच वर्षी सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत त्याने उत्तराखंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात नाबाद ५३ धावांची खेळी केली. क्रिकेटमधील चारही प्रकारात पदार्पण करणारा तो पहिला फलंदाज आहे.

वाचा-
देवदत्त पडीक्कलने २०१९-२० मध्ये विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने ११ डावात ६७.६६च्या सरासरीने ६०९ धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत त्याचा स्ट्राइक रेट ८१.०९ इतका होता. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी २०१९-२० मध्ये देखील त्याने १२ सामन्यात ६४.४४च्या सरासरीने ५८० धावा केल्या होत्या. यात एक शतक आणि ५ अर्थशतकांचा समावेश होता. या स्पर्धेत त्याचा स्ट्राइक रेट १७५.७५ होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here