आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. या सामन्यात राजस्थानपेक्षा चेन्नईचे पारडे जड असल्याचे दिसत आहे. पण राजस्थानचा संघही चेन्नईच्या संघाला धक्का देऊ शकतो. पण या सामन्यात दोन भाऊ आमने-सामने येणार असल्याचे दिसू शकते.

वाचा-

चेन्नई़ने आतापर्यंत पहिला सामना जिंकलेला आहे. या सामन्यात चेन्नईच्या सॅम करनने दमदार कामगिरी केली होती. सॅमने या सामन्यात जलदगतीने १८ धावा फटकावल्या होत्या, त्याचबरोबर एक विकेटही मिळवली होती. या सामन्यात राजस्थानकडून सॅमचा भाऊ टॉमदेखील खेळू शकतो, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या सामन्यात सॅम आणि टॉम हे दोन्ही करन बंधू एकमेकांसमोर उभे ठाकल जातील, असे म्हटले जात आहे.

वाचा-

चेन्नई आपल्या संघात मोठे बदल कधीच करताना दिसत नाही. त्यामुळे या सामन्यात मुंबईविरुद्ध खेळलेले सर्व खेळाडू कायम राहतील, असे म्हटले जात आहे. त्यानुसार सॅमला या संघात स्थान मिळू शकते. दुसरीकडे राजस्थानच्या संघाला चांगला गोलंदाज टॉमच्या रुपात मिळालेला आहे. त्यामुळे राजस्थानचा कर्णधार टॉमला संधी देईल, अशी चाहत्यांना आशा आहे.

वाचा-

दोन्ही संघांचा विचार केला तर राजस्थापेक्षा चेन्नईचा संघ वरचढ दिसत आहे. कारण चेन्नईच्या संघात सर्व नावाजलेले खेळाडू आहे. चेन्नईची सलामीची जबाबदारी शेन वॉटसन आणि मुरली विजय यांच्यावर असेल. त्यानंतर मधल्या फळीत अंबाती रायुडू, फॅफ ड्यू प्लेसिस, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, केदार जाधव, सॅम कुरन यांचा समावेश असेल. त्याचबरोबर फिरकीपटू म्हणून पीयुष चावला संघात असेल. वेगवान गोलंदाजीची धुरा यावेळी दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर सोपवण्यात येईल.

वाचा-

राजस्थानच्या संघाचे कर्णधारपद स्टीव्हन स्मिथकडे आहे. त्यामुळे तो संघाला कसा आकार देतो आणि कशी रणनिती आखतो, याकडे सर्वांच लक्ष असेल. राजस्थानला रॉबिन उथप्पा आणि यशस्वी जैस्वाल हे दमदार सलामी करून देण्यासाठी सज्ज असतील. त्यानंतर मधल्या फळीत कर्णधार स्मिथ, डेव्हिड मिलर, संजू सॅमसन, श्रेयस गोपाळ, रियान पराग हे फलंदाज असतील. राजस्थानच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मुख्यत्वेकरून जोफ्रा आर्चर आणि वरुण आरोन यांच्यावर असेल. त्याचबरोबर टॉम करन आणि जयदेव उनाडकट हे दोघे त्यांना साथ देतील.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here