चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सर्वांनाच धक्का देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही गोष्ट चेन्नईच्या आजच्या दुसऱ्या सामन्यातही पाहायला मिळाली. धोनीने दुसऱ्या सामन्यासाठीच्या संघात गेल्या सामन्यात मॅच विनर ठरलेल्या अंबाती रायुडूला वगळून एका युवा खेळाडूला संधात स्थान दिल्याचे पाहिले गेले.

मुंबई इंडियन्सबरोबरच्या पहिल्या सामन्यात अनुभवी अंबाती रायुडू आणि फॅफ ड्यु प्लेसिस यांनी संघाचा डाव फक्त सावरला नाही तर त्यांनी विजयाचा मार्गही बनवला. रायुडूने यावेळी अर्धशतक झळकावत चेन्नईच्या संघाला विजयासमीप पोहोचवले. रायुडूने ४८ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. रायुडूला यावेळी सुरेख साथ मिळाली होती ती फॅफची. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी दमदार भागीदारी रचत विजय संघाच्या दृष्टीपथात आणला होता.

धोनीने दुसऱ्या सामन्यासाठी अंबाती रायुडूला वगळून करोनाला हरवणाऱ्या महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संधी दिली आहे. ऋतुराज जेव्हा युएईमध्ये आला होता, त्यानंतर करोना चाचणी झाल्यावर तो पॉझिटीव्ह सापडला होता. ऋतुराजबरोबर करोना पॉझिटीव्ह सापडलेला दीपक चहर फिट होऊन पहिल्या सामन्यात खेळला होता. पण ऋतुराज मात्र फिट दिसत नव्हता. पण ऋतुराजची करोना चाचणी निगेटीव्ह आल्यावर त्याला संघाबरोबर सराव करण्याची संधी दिली होती. त्यानंतर धोनीने आता ऋतुराजला तर थेट संघात स्थान दिले आहे.

धोनी ऋतुराजला आजच्या सामन्यात रायुडूला वगळून संधी देईल, असे कोणालाही वाटले नसेल. कारण गेल्या सामन्यात रायुडूची खेळी पाहता तो दुसऱ्या सामन्यात खेळेल, असे चाहत्यांना वाटले होते. पण धोनीने यावेळी नेहमीप्रमाणे आपल्या चाहत्यांना धक्का दिल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता ऋतुराज या संधीचे कसे सोने करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्यामुळे धोनीचा ऋतुराजला संघात घेण्याचा निर्णय कितपत योग्य ठरतो, हे पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे धोनीचा हा प्रयोग किती यशस्वी होतो, हे पाहावे लागेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here