अबूधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामातील पाचवा सामना विरुद्ध ( ) यांच्याविरुद्ध अबूधाबीमध्ये होणार आहे. गतविजेत्या मुंबई संघाचा पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने ते विजयासाठी प्रयत्न करतील. तर दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता संघाला स्पर्धेची सुरुवात विजयाने करण्याची इच्छा असेल.

वाचा-
स्पर्धेत या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २५ लढती झाल्या आहेत. त्यापैकी १९ लढतीत मुंबईने तर ६ लढतीत कोलकाताने विजय मिळवला आहे. आकडेवारीचा विचार करता मुंबई संघाचे पारडे जड वाटत असले तरी युएईमधील त्यांची कामगिरी खराब आहे. पहिल्या सामन्यातून ही गोष्टी पुन्हा एकदा समोर आली. यामुळे मुंबई संघावर मानसिक दबाव अधिक आहे.

वाचा-
दोन्ही संघात स्फोटक फलंदाजांची संख्या अधिक आहे. शुभमन गिल तिसऱ्यांदा आयपीएलमध्ये खेळत आहे. चौकार आणि षटकार मारण्यात रोहित प्रमाणे आघाडीवर आहे. त्यामुळे या सामन्यात रोहित विरुद्ध शुभमन अशी लढत पाहायला मिळू शकते. या शिवाय ताकतीच्या जोरावर चेंडू मैदानाबाहेर घालवणारे हार्दिक पंड्या आणि आंद्रे रसले हे देखील सामन्याचे चित्र बदलू शकतात.

वाचा-
कोलकाता संघाकडे इयोन मॉर्गन सारखा तगडा खेळाडू आल्यामुळे यावेळी त्यांची ताकद वाढली आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईकडे नाथन कूल्टर नाइल सारखा अष्ठपैलू खेळाडू आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात चांगली सुरुवात झाल्यानंतर देखील मुंबई संघाला १६२ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे कोलकाताविरुद्धच्या सामन्यात सौरभ तिवारीच्या एवजी इशान किशनला संधी दिली जाऊ शकते.

वाचा-

मुंबईकडे आहे अतिरिक्त गोलंदाज
जसप्रित बुमराहला पहिल्या सामन्यात प्रभावी कामगिरी करता आली नाही. पण तो फार काळ असा राहणार नाही. मुंबईकडे क्रुणाल पंड्या, राहुल चाहर सोबत पोलार्डच्या रुपाने एक अतिरिक्त गोलंदाज आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here