नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या () ने करोना व्हायरसच्या काळात युएईमध्ये (IPL) च्या १३व्या हंगामाचा घाट घातला. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खेळाडूंच्या सुरक्षेवर तसेच जैव सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी बीसीसीआयने बराच पैसा खर्च केला.

वाचा-
आयपीएलच्या आयोजनासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारे बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मात्र कॉस्ट कटिंगच्या मुडमध्ये आहे. खर्चात कपात करण्यासाठी बीसीसीआयने () मधील ११ कोच ()चा करार न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा-

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार कोरना नंतर बीसीसीआयने प्रथम कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एनसीएमधील ११ प्रशिक्षकांच्या कराराचा कालावधी वाढवण्यात येणार नाही. ज्या प्रशिक्षकांचा करार वाढवण्यात येणार नाही त्यात पाच निवृत्त खेळेडू देखील आहेत. यात रमेश पवार, एस एस दास,ऋषिकेश कानिटकर, सुब्रतो बॅनर्जी आणि सुजीत सोमसुंदर यांचा समावेश आहे.

वाचा-
एनसीएच्या प्रमुख राहुल द्रविड यांनी गेल्या आठवड्यात या सर्वांना याची माहिती दिली. या सर्वांच्या पगारावर बीसीसीआयला ३० ते ३५ लाख इतका खर्च येतो.

बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयाबद्दल आम्हाला काहीच माहिती दिली गेली नव्हती. तसेच या निर्णयाचे योग्य कारण देखील सांगितले नाही. दोन दिवसांपूर्वी राहुल द्रविड यांनी फोनवरून बीसीसीआय आमचा करार वाढवणार नसल्याचे सांगितले. गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही वेबिनारमध्ये सहभागी होत आहोत आणि भविष्यातील गोष्टींचे नियोजन करत आहोत. या सर्व गोष्टींच्या मध्ये अचानक सांगितले गेले की आता आमची गरज नाही.

वाचा-
करोना व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून NCA पूर्णपणे बंद आहे. गेल्या महिन्यात बीसीसीआयच्या वार्षिक करारात असलेले खेळाडू सरावासाठी एनसीएमध्ये आले होते. २०१९ साली राहुल द्रवीडच्या सांगण्यावरून नव्या प्रशिक्षकांना एनसीएमध्ये दाखल करून घेतले होते. यामुळे आधीपासून काम करणाऱ्या प्रशिक्षकांवरील भार हलका होईल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here