नवी दिल्ली: IPL 2020 आयपीएलमध्ये मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा १६ धावांनी पराभव केला. चेन्नईच्या या पराभवानंतर कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या बॅटिंग आयडीवर अनेक जण टीका करत आहेत. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने देखील यावर प्रतिक्रिया दिली.

धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणे ही गोष्टी काही पटत नाही. त्याने ऋतुराज गायकवाड आणि सॅम करन यांना आधी पाठवले. धोनीने नेतृत्व दाखवण्याची गरज होती. २१७ चे लक्ष्य पार करताना सातव्या क्रमांकावर येतो. याला काही कारण दिसत नाही, असे गंभीर म्हणाला.

वाचा-
धोनीने अखेरच्या ओव्हरमध्ये चेंडू मारण्यास सुरुवात केली. पण तोपर्यंत फार उशिर झाला होता. २०१० नंतर राजस्थानने चेन्नईविरुद्ध प्रथमच पहिल्यांदा बॅटिंग करताना विजय मिळवला आहे.

वाचा-
जर तुम्ही शेवटच्या ओव्हरबद्दल बोलायचे झाले तर धोनीने तीन षटकार मारले. पण त्यातून काहीच सिद्ध होत नाही. हेच जर अन्य कोणत्याही कर्णधाराने केले असते तर भरपूर टीका झाली असती.

वाचा-

धोनीने दिले उत्तर…
मुंबई विरुद्धच्या सामन्यात देखील धोनीने स्वत: येण्या ऐवजी आधी रविंद्र जडेजाला आणि मग सॅम करनला फलंदाजीला पाठवले. अर्थात त्या सामन्यात धोनीच्या निर्णयाचा फायदा झाला. पण राजस्थानविरुद्ध मात्र धोनीने स्वत:ला मागे ठेवून चूक केल्याचे सर्वांचे म्हणणे आहे.

वाचा-
मी गेल्या काही काळापासून फलंदाजी केली नाही. क्वारंटाइनचा फार फायदा झाला नाही. संघात काही प्रयोग केले जात आहेत. सॅम करनला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे हा त्याचाच भाग होता. आमच्याकडे पर्याय आहेत, त्यामुळे जुन्या धोरणाचा वापर पुन्हा करू शकतो. स्पर्धेच्या सुरुवातीला असे प्रयोग करण्याची संधी असल्याचे धोनीने सांगितले.

व्हिडिओ पाहण्यासाठी करा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here