वाचा-
चेन्नईविरुद्धच्या सामन्यात चर्च झाली ती संजू सॅमसन, स्टीव्ह स्मिथ, जोफ्रा आर्चर आणि राहुल तेवतिया यांची, पण राजस्थानचा असा एक खेळाडू आहे ज्याची चर्चा झाली ती खराब कामगिरीमुळे. डेव्हिड मिलरने चेन्नईविरुद्ध आयपीएलमध्ये राजस्थानकडून पदार्पण केले.
वाचा-
आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात डायमंड डकवर बाद झाला. एक धाव तर लांबची गोष्ट मिलरला एक चेंडू देखील खेळता आला नाही. संजू सॅमसनने राजस्थानकडून वादळी खेळी केल्यानंतर मिलर फलंदाजीसाठी आला. दुसऱ्या बाजूला स्टीव्ह स्मिथ होता. स्मिथने दोन धावा घेण्यासाठी सांगितल्यावर मिलर पळाला पण तेव्हाच तो थावबाद झाला.
वाचा-
डायमंड डक म्हणजे काय?
मिलरने धावबाद होण्याआधी एकही चेंडू खेळला नव्हता. यामुळेच तो डायमंड डक ठरला. क्रिकेटमध्ये जो फलंदाज एकही चेंडू न खेळता बाद होतो त्याला डायमंड डक असे म्हणतात. जर खेळाडू पहिल्या चेंडूवर बाद झाला तर त्याला गोल्डन डक म्हटले जाते. तर जो खेळाडू शून्यावर बाद होतो त्याला सिल्वर डक म्हटले जाते.
वाचा-
राजस्थानकडून आयपीएलमध्ये पदार्पण करताना डेव्हिड मिलर हा डायमंड डक झाला. ही धाव घेताना मिलर धावबाद होण्यापासून वाचू शकला असता. पण त्याची बॅट पुढे नव्हती. त्यामुळे तो बाद झाला. मिलर २०१२ पासून खेळत आहे. त्याच्या नावावर एक शतक आणि ९ अर्थशतके आहेत. त्याने स्पर्धेत १ हजार ८५० धावा केल्या आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी
करा.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times