बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संजू सॅमसनने तुफानी खेळी साकारली. संजूने फक्त १९ चेंडूंत आपले अरअधशतक पूर्ण केले. आपल्या या धमाकेदार खेळीचं रहस्य आता दस्तुरखुद्द संजूनेच सांगितलं आहे. आपल्या धडाकेबाज खेळीबाबत संजू नेमकं काय म्हणाला, पाहा…

आपल्या या खेळीबाबत संजू म्हणाला की, ” आयपीएलमध्ये खेळत असताना तुमच्या फटक्यांमध्ये विविधता असायला हवी. तुमच्याकडे फक्त ठराविक फटके असतील तर तुम्हाला मोठी खेळी साकारता येत नाही. मला पाच महिन्यांचा ब्रेक मिळाला आणि मी त्यामध्ये माझ्या फलंदाजीवर जास्त लक्ष केंद्रीत केले होते. त्याचा मला चांगलाच फायदा झाला. त्याचबरोबर फिटनेस, आहार आणि सरावावर मी जास्त धीर दिला. मी जास्त व्यायाम केला आणि या सर्व गोष्टींचे फळ मला मिळाले, असे मला वाटते.”

चेन्नईविरुद्धच्या सामन्याच संजूने जोरदार फटकेबाजी केली, त्यामुळेच सामनावीराचा पुरस्कारही त्याला मिळाला. कालच्या सामन्यात संजूने सुरुवातीपासून चेन्नईच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. फिरकी गोलंदाजी हे चेन्नईच बलस्थान समजले जाते. पण संजूने त्यांच्या बलस्थानावरच जोरदार हल्ले चढवले. संजूने चेन्नईचे गोलंदाजी खिळखिळी करून टाकली होती. कारण आपल्या धडाकेबाज खेळीत संजूने तब्बल ९ षटकारांची आतिषबाजी केली. संजूने यावेळी फक्त १९ चेंडूंमध्ये वादळी खेळी साकारत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतरही संजू बरसत राहीला. संजूने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ३२ चेंडूंत १ चौकार आणि ९ षटकारांच्या जोरावर ७४ धावांची दमदार खेळी साकारली.

यावेळी त्याला कर्णधार स्टीव्हन स्मिथचीही चांगली साथ मिळाली. या दोघांनी मिळून फिरकीपटू पीयुष चावलाच्या गोलंदाजीवर तब्बल सहा षटकार वसूल केले, तर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवरही चार षटकार लगावले. संजू आणि स्मिथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची झंझावाती भागीदारी रचली. त्यामुळेच राजस्थानच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. संजून धडकेबाज फलंदाजी केलयामुळेच राजस्थानच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. त्यामुळेच संजू हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here