भारताचा कर्णधार विराट कोहली हा सर्वात फिट खेळाडू समजला जातो. पण आता कोहली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर फिटनेसवर चर्चा करणार आहे. मोदी आणि कोहली यांच्यामध्ये फिटनेसवर नेमकी चर्चा होणार कधी, पाहा…

सध्याच्या घडीला आयपीएल सुरु आहे. त्याचबरोबर जगावर करोना व्हायरसचेही सावट आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला सर्वांसाठी फिटनेस हा सर्वात महत्वाचा आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि विराट कोहली यांच्यामध्ये फिटनेसबाबत उद्या चर्चा होणार असल्याचे समजते आहे. या चर्चा सत्रामध्ये नेमकं काय होणार आहे, याबाबतची माहिती कोहलीने आपल्या ट्विटरवरून दिली आहे.

‘फिट इंडिया डायलॉग’ असा एक कार्यक्रम उद्या होणार आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि विराट कोहली यांच्यामध्ये फिटनेसबाबत चर्चा होणार आहे. ही चर्चा दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. या चर्चेमध्ये आरोग्य, व्यायाम, आहार या गोष्टींवर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे पूर्ण स्वरुप अजूनपर्यंत समजू शकलेले नाही. पण या कार्यक्रमात फिटनेसची काही रहस्य नक्कीच चाहत्यांना ऐकायला मिळू शकतील.

आतापर्यंत एकही जेतेपद न जिंकलेल्या आरबीसीच्या संघाने सोमवारी या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. हा सामना जिंकल्यावर विराट कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये चांगलीच धमाल केली. या गोष्टीचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय केलं, पाहा…

या हंगामातील पहिला सामना जिंकल्यावर कोहली हा भन्नाट खूष झालेला पाहायला मिळाला. सामना जिंकल्यावर कोहलीने मैदानात जोरदार सेलिब्रेशन तर केले. पण त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये एकच धमाल उडवून दिली. यावेळी आरसीबीच्या संघातील खेळाडूंनीही कोहलीला चांगली साथ दिली. कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये नेमकं केलं तरी काय, पाहा…

युजवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने हा सामना जिंकला होता. चहलने हैदराबादच्या तीन फलंदाजांना बाद केले होते. त्यामुळे आरसीबीला हैदराबादवर दहा धावांनी विजय मिळवता आला होता. आरसीबीने यावेळी विजयी सलामी दिली आणि त्यामुळेच कोहली आनंदात होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here