>> ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत विराटला क्रिकेटमधील एक जुना विक्रम मोडण्याची संधी आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांची नोंद ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. त्याने कर्णधापदावर असताना ४१ शतक झळकावली आहेत. विराटने कर्णधार म्हणून कसोटीत २० तर वनडे २१ शतके केली आहेत. पॉन्टिंगचा विक्रम मोडण्यासाठी विराटला एका शतकाची गरज आहे. आजच्या सामन्यात विराटने शतक केल्यास तो पॉन्टिंगला मागे टाकले.
वाचा-
>> विराटने आज शतकी खेळी केल्यास तो कर्णधारपदावर असताना सर्वात वेगाने शतक करणारा कर्णधार ठरले. पॉन्टिंगने ३७६ सामन्यात ४१ शतके केली होती. तर विराटने १९६ सामन्यात ४१ शतक करण्याची कामगिरी केली आहे. अनेक वेळा कर्णधार झाल्यानंतर खेळाडूंची कामगिरी खराब होते. पण विराटला हा नियम लागू नाही. विराटची कसोटीतील सरासरी ६३.८० इतकी आहे. तर कर्णधारपदावर असताना त्याची सरासरी ५४.९७ इतकी आहे. वनडेमध्ये विराटची करिअरमधील सरासरी ५९.८४ तर कर्णधार झाल्यानंतरची सरासरी ७७.६० इतकी आहे.
वाचा-
>> ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराटने एक कॅच पकडल्यास तो राहुल द्रवीडला मागे टाकेल. द्रवीडने वनडेमध्ये १२४ कॅच पकडले आहेत. तर विराटने देखील १२४ कॅच पकडले आहेत. पण द्रवीडने ३४० वनडेत ही कामगिरी केली होती. विराटने २४२ वनडेत १२४ कॅच पकडले आहेत. भारताकडून सर्वाधिक कॅच घेणाऱ्या खेळडूंच्या यादीत माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन १५४ कॅचसह पहिल्या स्थानावर तर सचिन तेंडुलकर १४० कॅचसह दुसऱ्या स्थानावर आहे.
>> विराटला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने वनडेत ४९ शतक केली आहेत. या ४९ शतकांपैकी २० शतक त्याने घरच्या मैदानावर झळकावली आहेत. विराटने भारतात आतापर्यंत १९ शतक केली आहेत. आजच्या सामन्यात शतक केल्यास तो सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करू शकेल.
वाचा सविस्तर बातमी-
Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News