दुबई: आयपीएलमध्ये आज विरुद्ध ( ) यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. या लढतीकडे विरुद्ध असे म्हणून देखील पाहिले जात आहे. पंजाबला पहिल्या सामन्यात शॉर्ट रनचा फटका बसला होता. आता या सामन्यात संबंधित वाद विसरून पंजाबला खेळावे लागणार आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अंपायरने १९व्या षटकात एक शॉर्ट रन दिल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. सुपर ओव्हरमध्ये पंजाबला पराभव स्विकारावा लागला होता.

वाचा-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बेंगळुरूने पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा पराभव करत विजयी सुरुवात केली होती. विजयाची लय कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

वाचा-
बेंगळुरूकडून पहिल्या सामन्यात देवदत्त पडिक्कलने पदार्पणात अर्थशतक केले होते. तर एबी डिव्हिलियर्सने देखील धमाकेदार ५० धावा केल्या होत्या. आता या सामन्यात कोहली आणि ऑरोन फिंच यांची बॅट चालते का ते पाहावे लागले. गोलंदाजीच युजवेंद्र चहल हा महत्त्वाचा खेळाडू ठरेल. हैदराबादविरुद्ध मिळवलेल्या विजयात चहलची भूमिका महत्त्वाची होती. यात आता ख्रिस मॉरिसचा देखील समावेश असेल.

वाचा-

पंजाब संघ ख्रिस गेलला मैदानात उतरवणार

मयांक अग्रवालने गेल्या सामन्यात दमदार खेळी केली. पण त्याला विजयासाठीची एक धाव काढता आली नाही. कर्णधार केएल राहुल, ग्लेन मॅक्सवेल आणि निकोलस पूरन यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. या सामन्यात ख्रिस गेलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

संभाव्य संघ-()

बंगळुरू: ऑरोन फिंच, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, जोश फिलिप (विकेटकिपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन आणि मोहम्मद सिराज

पंजाब- लोकेश राहुल (कर्णधार), मयांक अग्रवाल, करुण नायर, निकोलस पूरन किंवा ख्रिस गेल, सरफराज खान, ग्लेन मॅक्सवेल, कृष्णप्पा गौतम, ख्रिस जॉर्डन, शेल्डन कॉटरेल, रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमी

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here