नवी दिल्ली: महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा पहिल्या सामन्यात पराभव करून () संघाने मोठा धक्का दिला. प्रथम फलंदाजी करत राजस्थानने चेन्नईसमोर २१७ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. राजस्थानकडून संजू सॅमसन, कर्णधार () आणि अखेरच्या षटकात जोफ्रा आर्चर यांनी धमाकेदार खेळी केली.

वाचा-
राजस्थान विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचे पारडे जड मानले जात होते. पण राजस्थानने सामन्यावर पहिल्या चेंडूपासून पकड ठेवली होती. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ पहिल्या षटकापासून मैदानात होता. त्याने ४७ चेंडूत ६९ धावा केल्या. यात चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता.

वाचा-
चेन्नई विरुद्ध स्मिथने शानदार शॉट खेळले. राजस्थान संघाने त्याच्या सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत स्मिथने धोनीचा हेलिकॉप्टर शॉट मारला आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात राजस्थानकडून संजू सॅमसनने ९, स्मिथने ४ तर आर्चरने चार षटकार मारले होते. आता पुढील काही सामन्यात स्मिथकडून धोनीच्या सारखा हेलिकॉप्टर शॉट पाहायला नक्की मिळू शकतो.

वाचा-

राजस्थान संघाचा पुढील सामना किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) विरुद्ध २७ तारखेला होणार आहे. या सामन्यासाठी जोस बटलर देखील उपलब्ध होणार असल्याने राजस्थान संघाची ताकद वाढणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here