नवी दिल्ली: आयपीएलच्या १३व्या हंगामात महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज () संघापुढील अचडणी काही केल्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आधी संघातील दोन खेळाडूंसह २ खेळाडू करोना चाचणीत पॉझिटिव्ह आले. त्यानंतर सुरेश रैना आणि हरभजन सिंग हे महत्त्वाच्या खेळाडूंनी माघार घेतली. पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबईविरुद्ध विजय मिळवला खरा. पण त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने त्यांना झटका दिला.

वाचा-
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा संघ अडचणीत असताना ( ) ने संयमी फलंदाजी केली आणि विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यानंतर राजस्थानविरुद्धच्या सामन्यात फिट नसल्यामुळे अंबाती रायडूला खेळता आले नाही. त्याच्या ऐवजी ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली. पण तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला.

वाचा-
अंबाती रायडूची कमतरता चेन्नईला राजस्थानविरुद्ध जाणवली. आता चेन्नईचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध उद्या (शुक्रवारी) होणार आहे. या सामन्यासाठी देखील अंबाती रायडू उपलब्ध असणार नाही. चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने ही माहिती दिली आहे.

वाचा-
रायडूने पहिल्या सामन्यात ४८ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या होत्या. ज्या सामन्यात रायडू खेळला नाही. त्या सामन्यात चेन्नईचा १६ धावांनी पराभव झाला होता. आता आणखी एका सामन्यात रायडू नसल्याने चेन्नईची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

रायडू सध्या हेमस्ट्रिंगची दुखापत आहे. त्यामुळे तो आणखी एक सामना खेळणार नाही हे जवळपास निश्चित असल्याचे चेन्नई संघाचे सीईओंनी ANIला सांगितले. जेव्हा तो पूर्णपणे फिट होईल तेव्हा पुन्हा संघात येईल.

वाचा-
रायडूने मुंबई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात फाफ डुप्लेसिस सोबत ११५ धावांची भागिदारी केली होती. या दोघांमुळे चेन्नईला विजय मिळवता आला होता.

शुक्रवारी चेन्नईचा सामना दिल्लीविरुद्ध होणार आहे. त्यानंतर चेन्नईचा सामना थेट २ ऑक्टोबर रोजी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. त्यामुळे रायडूला हैदराबादविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here