दुबई: : कर्णधार केएल राहुल ( ) च्या स्फोटक शतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा ९७ धावांनी पराभव केला. बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबने ३ बाद २०६ धावांची मोठी धावसंख्या उभी केली. पण बेंगळुरूचा डाव १०९ धावात संपुष्ठात आला. या विजयासह पंजाबने गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

वाचा-
प्रथम फलंदाजी करताना पंजाबने सुरुवात फार आक्रमक केली नाही. दिल्ली विरुद्धच्या सामन्यातील हिरो मयांक अग्रवाल २६ धावांवर बाद झाला.त्यानंतर निकोलस पूरन देखील १७ धावांवर माघारी परतला. तर ग्लेन मॅक्सवेल देखील फक्त ५ धावांवर बाद झाला. पण दुसऱ्या बाजूला कर्णधार राहुलने जम बसवला होता. त्यांनी अखेरच्या १० षटकात कर्णधार केएल राहुलने स्फोटक शतकी खेळी केली. त्यात खुद्द विराट कोहलीने त्याला दोन वेळा जीवनदान दिले.

वाचा-
विराट कोहलीने राहुलला ८३ धावांवर जीवनदान दिले. त्यानंतर पुन्हा ८९ धावांवर विराटने अगदी सोपा कॅच सोडला. या दोन्ही जीवनदानाचा राहुलने चांगलाच फायदा घेतला. त्याने आक्रमकपणे बॅटिंग केली. राहुलने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट १९१.३० इतका होता.

वाचा-
विजयासाठी २०७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या बेंगळुरूची सुरुवात अत्यंत खराब झाली. पदार्पणात अर्धशतक करणारा देवदत्त पडिक्कल १ धाव करून बाद झाला. त्यानंतर विराटने जोश फिलिपला प्रमोट केले. पण तोही शून्यावर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या विराटकडून मोठी अपेक्षा होती. विराटने पाचव्याच चेंडूवर एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि बाद झाला. त्यानंतर ऑरोन फिंच २० धावांवर बाद झाला. बेंगळूरूचे अखेरचे आशा असलेला एबी डिव्हिलियर्स २८ धावांवर माघारी परतला. एबी बाद झाला तेव्हा बेंगळूरूची अवस्था ५ बाद ५७ अशी झाली. त्यानंतर अखेरच्या ५ फलंदाजांनी ५२ धावांची भर टाकली.

वाचा-
बेंगळुरूने १७ षटकात सर्वा बाद १०९ धावा केल्या. एकट्या राहुलने केलेल्या १३२ धावा देखील बेंगळुरूच्या सर्व फलंदाजांना करता आल्या नाहीत. पंजाबकडून रवी बिश्नोई, एम अश्विन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here