वाचा-
पंजाबने सुरुवात फार आक्रमक केली नाही. पण अखेरच्या १० षटकात कर्णधार केएल राहुलने स्फोटक शतकी खेळी केली. त्यात खुद्द विराट कोहलीने त्याला दोन वेळा जिवनदान दिले. राहुलने फक्त ६९ चेंडूत १४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १३२ धावा केल्या.
वाचा-
या खेळीसह राहुलने आयपीएलमधील एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. राहुलने आयपीएलमध्ये सर्वात वेगाने २ हजार धावा करण्याचा विक्रम केला. याबाबत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने ६३ डावात २ हजार धावा केल्या होत्या. तर राहुलने फक्त ६० डावात २ हजार धावांचा टप्पा पार केला.
वाचा-
आयपीएलमध्ये सर्वात वेगाने २ हजार धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ४८ धावा ही कामगिरी केली आहे. तर शॉन मार्शने ५२ डावात २ हजार धावा केल्या.
वाचा-
आयपीएलमध्ये २ हजार धावा पूर्ण करणारा राहुल ३२वा फलंदाज आहे. तर २०वा भारतीय खेळाडू आहे. याआधी गौतम गंभीरने ६८ डावात, सुरेश रैनाने ६० डावात, विरेंद्र सेहवागने ७० डावात २ हजार धावा केल्या होत्या. राहुलचे आयपीएलमधील हे तिसरे शतक आहे. तर भारतीय खेळाडूकडून आयपीएलमध्ये झालेली ही सर्वोच्च खेळी आहे. याआधी २०१८ साली ऋषभ पंतने नाबाद १२८ धावा केल्या होत्या.
राहुलने ६० चेंडूत ९० धावा केल्या होत्या. पण अखेरच्या ९ चेंडूत त्याने ४२ धावांचा पाऊस पाडला.विराट कोहलीने राहुलला ८३ धावांवर जीवनदान दिले. त्यानंतर पुन्हा ८९ धावांवर विराटने अगदी सोपा कॅच सोडला. या दोन्ही जीवनदानाचा राहुलने चांगलाच फायदा घेतला. त्याने आक्रमकपणे बॅटिंग केली. राहुलने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट १९१.३० इतका होता.
राहुलची शतकी खेळी करा.
आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या
ख्रिस गेल- नाबाद १७५
मॅक्कुलम- नाबाद १३८
एबी डिव्हिलियर्स- नाबाद १३३
केएल राहुल- नाबाद १३२
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times