सध्याच्या घडीला आयपीएल चांगलेच रंगात आलेले आहे. आयपीएलमधील फक्त मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या कुटुंबियांना आयपीएलसाठी युएईला नेले आहे. मुंबईचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला काही दिवसांपूर्वीच पूत्ररत्न झाले होते. आता हाच ज्युनिअर पंड्या हार्दिकला कसा चीअर करतो आहे, याचा एक फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधाव रोहित शर्माच्या मुलीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. चाहत्यांनी रोहितच्या या व्हिडीओला चांगलीच पसंती दिली होती. त्यानंतर आता हार्दिकच्या मुलाचा फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. हार्दिकने आपल्या फेसबूकवर आपला मुलगा आणि पत्नी यांचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईकडे काही असे खेळाडू आहेत जे अखेरच्या क्षणी सामना फिरवू शकतात. असाच एक खेळाडू म्हणजे हार्दिक पंड्या होय. मुंबई संघाने हार्दिकचा नेट मधील सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो जोरदार फटकेबाजी करताना दिसतोय. फक्त ४९ मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक सुरुवातीला बचावात्मक पद्धतीने खेळतो. पण त्यानंतर एकापाठोपाठ एक मोठे शॉट खेळण्यास सुरूवात करतो. हार्दिकचा प्रत्येक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय.

आतापर्यंत हार्दिकला आयपीएलमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. हार्दिकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. पण आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये तरी त्याला लय सापडलेली दिसत नाही. मुबंईला पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सबरोबर पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र मुंबईने विजय मिळवला आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. त्यामुळे आता पुढच्या सामन्यात मुंबई कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर हार्दिकची कामगिरी होते कशी, हेदेखील चाहते नक्कीच पाहतील. हार्दिक सध्याच्या घडीला कसून सराव करत आहे. त्यामुळे हार्दिक कधी मैदान गाजवतो आणि मुंबईच्या संघाला कधी सामना जिंकवून देतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here