याबाबत गावस्कर म्हणाले की, ” मी आणि आकाश चोप्रा समालोचन करत होतो. त्यावेळी लॉकडाऊनमध्ये खेळाडूंना जास्त सराव करायला वेळ मिळाला नाही आणि त्यामुळेच त्यांना लय सापडत नाही, असे आकाश म्हणत होता. त्यावेळी मी त्याला बोललो की, विराटलाही लॉकडाऊनमध्ये जास्त सराव करण्याची संधी मिळाली नाही. लॉकडाऊनमध्ये अनुष्काबरोबर विराट आपल्या इमारतीमध्ये क्रिकेट खेळत असल्याचे मी पाहिले. त्यामुळे विराट अनुष्काबरोबर लॉकडाऊनमध्ये सराव करत होता, असे मी म्हटले. त्यामध्ये काही चुकीचे आहे, असे माला तरी वाटत नाही.”
नेमकं प्रकरण आहे तरी काय…
भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी कोहलीवर खरमरीत टीका केली होती. पण आता गावस्कर यांच्यावर अनुष्का शर्मा चांगलीच भडकलेली पाहायला मिळत आहे. अनुष्काने गावस्कर यांना चांगलेच सुनावले होते. अनुष्का म्हणाली होती की, ” खेळावर भाष्य करताना गेल्या इतक्या वर्षात तुम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला असेल याची मला खात्री आहे. तितकाच आदर मला आणि आम्हाला असावा असं तुम्हाला वाटत नाही का?”
विराटकडून जेव्हा हे झेल सुटले तेव्हा गावस्कर हे समालोचन करत होते. त्यावेळी गावस्कर यांनी विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काबरोबरच सराव केला, असे म्हटले. त्यावेळी चांगलाच हास्यविनोद पाहायला मिळाला. पण त्यानंतर मात्र या त्यांच्या वक्तव्यावर वाद झाल्याचेही पाहायला मिळाले.
कालच्या सामन्याचा नायक ठरला तो पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल. या हंगामातील राहुलने पहिले शतक झळकावले. पण विराट कोहलीने राहुलला ८३ धावांवर जीवनदान दिले. त्यानंतर पुन्हा ८९ धावांवर विराटने अगदी सोपा कॅच सोडला. या दोन्ही जीवनदानाचा राहुलने चांगलाच फायदा घेतला. त्याने आक्रमकपणे बॅटिंग केली. राहुलने ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट १९१.३० इतका होता.
आयपीएलच्या १३व्या हंगामात पहिल्या शतकाची नोंद झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने धमाकेदार शतकी खेळी केली. राहुलने फक्त ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. या खेळीत त्याला बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने दोन वेळा जीवनदान दिले. विराटने त्याचे दोन कॅच सोडले. या कॅचची मोठी किमती त्यांना द्यावी लागली. पंजाबने प्रथम फलंदाजी करत ३ बाद २०६ धावा केल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times