चेन्नईने नाणेफेक जिंकली आणि दिल्लीच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. यावेळी दिल्लीचे दोन्ही सलामीवीर पृथ्वी आणि शिखर धवन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पृथ्वी आणि शिखर यांनी सावध सुरुवात केली आणि त्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमणही केले. पृथ्वी आणि शिखर यांनी संघाला ९४ धावांची सलामी दिली
पृथ्वी आणि शिखर ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण चेन्नईचा फिरकीपटू पीयुष चावलाने ही जोडी फोडली. पीयुषने यावेळी शिखरला पायचीत पकडले. शिखरने यावेळी २७ चेंडूंत ३५ धावा केल्या. पण दुसऱ्या बाजूने पृथ्वी चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होता.
पृथ्वीने यावेळी चेन्नईच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. पृथ्वी आता शतक झळकावणार का, असे वाटत होते. पण पुन्हा एकदा पीयुष चावलाने संघाला यश मिळवून दिले. पीयुषने धवनला बाद केल्यावर आपल्या पुढच्याच षटकात पृथ्वीलाही तंबूचा रस्ता दाखवला. पृथ्वीने यावेळी ४३ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६४ धावांची खेळी साकारली. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यावर मात्र श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी संघाची जबाबदारी सांभाळली आणि जलदगतीने धावा जममवल्या. सलामीवीरांची जोडी फुटल्यावर पंत आणि अय्यर यांची चांगलीच जोडी जमलेली पाहायला मिळाली. या दोघांनी संघाला दिडशे धावांची मजल सहज मारुन दिली. पण श्रेयसला यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. श्रेयसला यावेळी २६ धावाच करता आल्या.
चेन्नईच्या संघाकडून यावेळी फिरकीपटू पीयुष चावला हा यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले. गेल्या सामन्यात पीयुष चांगलाच महागडा ठरला होता. पण या सामन्यात पीयुषने दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करत संघाला दुहेरी यश मिळवून दिले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times