नवी दिल्ली: IPLमध्ये सलग दुसऱ्या पराभवाने (Chennai Super Kings) ला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई संघाने पहिल्या सामन्यात मुंबई सुपर किंग्जचा पराभव केला. पण प्रथम राजस्थान रॉयल्सने आणि नंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने त्यांचा पराभव केला. या दोन्ही सामन्यात चेन्नईला धावसंख्या गाठता आली नाही.

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईला २१७ धावांचे लक्ष्य दिले होते. पण या सामन्यात धोनीने पुन्हा प्रयोग केले आणि त्याला यश आले नाही. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात देखील देखील चेन्नईचे फलंदाज अपयशी ठरले. तसेच दोन्ही सामन्यात गोलंदाजांना धावांवर नियंत्रण ठेवता आले नाही.

वाचा-
या दोन्ही पराभवानंतर म्हणाला की संघात एका फलंदाजाची कमी जाणवत आहे. चेन्नईच्या पहिल्या सामन्यातील विजयाचा हिरो दुखापतीमुळे दोन सामने खेळू शकला नाही. आता पुढील सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. रायडू हेमस्ट्रिंगची दुखापत आहे. त्यामुळे तो दोन सामन्यांसाठी उपलब्ध नव्हता. चेन्नईचा सामना थेट २ ऑक्टोबर रोजी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. त्यामुळे रायडूला हैदराबादविरुद्ध खेळण्याची संधी मिळू शकेल.

दिल्लीविरुद्ध आघाडीच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभी न केल्यामुळे दबाव वाढल्याचे धोनीने सांगितले. अर्थात पुढील सामन्यात अंबाती रायडूचा समावेश होईल.

वाचा-
स्पर्धा सुरू होण्याआधीच चेन्नई संघातून सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी माघार घेतल्यामुळे चेन्नईची ताकद कमी झाल्याचे मानले जात होते. राजस्थान आणि दिल्लीविरुद्ध मुरली विजय आणि शेन वॉट्सन यांना चांगली सुरुवात करून देता आली नाही. तर ऋतूराज गायकवाडला दोन्ही सामन्यात संधी देऊन देखील त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही.

रायडूने पहिल्या सामन्यात ४८ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या होत्या. रायडूने मुंबई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात फाफ डुप्लेसिस सोबत ११५ धावांची भागिदारी केली होती. या दोघांमुळे चेन्नईला विजय मिळवता आला होता. चेन्नईकडून डुप्लेसिसने तिन्ही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here