शिलाँग: मेघालयमधील डोंगराळ भागात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. विविध ठिकाणी अनेक घरांवर दरड कोसळल्यामुळे काहींचा मृत्यू झाला आहे. या मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. तर अन्य तीन जण बेपत्ता आहेत.

वाचा-
मेघालयकडून राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या रजिया अहमद आणि स्थानिक खेळाडू फिरोजिया खान यांचा मृत्यू झाल्याचे मावनेईचे सरपंच बाह बुद यांनी सांगितले. या दोघींचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.

वाचा-
रजियाने २०११-१२ मध्ये राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमधून राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. रजियाने गेल्या वर्षी बीसीसीआयद्वारे आयोजित स्पर्धेत मेघालयकडून भाग घेतला होता, असे राज्य क्रिकेट संघाचे महासचिव गिडिओन खारकोंगोर यांनी सांगितले.

वाचा-
गिडिओन यांनी दोन्ही क्रिकेटपटूंच्या निधनावर शोक व्यक्त केला. काकोली चक्रवर्ती म्हणाल्या, रजियाची आठवण नेहमी येईल. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here