नवी दिल्ली: संघासाठी आयपीएलची सुरुवात फार चांगली झालेली नाही. पहिल्या सामन्यातील विजयानंतर संघाला सलग दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या दोन्ही सामन्यात संघातील अनेक त्रूटी समोर आल्या आहेत. चेन्नईला आणि कॅप्टन कुल धोनीला सरळ सरळ () ची कमतरता जाणवत आहे.

वाचा-
चेन्नईच्या दुसऱ्या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी रैनाला परत बोलवण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी #ComeBackMrIPL हा हॅशटॅग वापरला आहे. भारतात हा हॅशटॅग अव्वल स्थानावर आहे.

वाचा-
राजस्थान नंतर दिल्लीकडून झालेल्या पराभवानंतर कर्णधार महेंद्र सिंह धोनीने देखील मान्य केले की, संघात फलंदाज आणि गोलंदाजी याबाबत कमतरता आहे. दरम्यान सुरेश रैनाच्या संघात परत येण्याबाबत सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी हे वृत्त फेटाळून लावले.

वाचा-
संघ रैनाच्या खासगी आयुष्याचा सन्मान करते आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत परत येण्यास सांगणार नाही, असे विश्वनाथ यांनी सांगितले. आम्ही तो परत येईल याची वाट पाहत नाही. कारण रैनाने स्वत: उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचा सम्मान करतो, सीईओ म्हणाले.

रैना आयपीएलमधील स्टार खेळाडू आहे. रैनाने अनेक वेळा एकहाती चेन्नईला सामना जिंकून दिला आहे. या स्पर्धेत त्याने १९३ सामन्यात ५ हजार ३५६ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३३.३४ असून स्ट्राईक रेट १३७.१४ इतका आहे. आयपीएलमध्ये रैनाने एक शतक आणि ३८ अर्धशतक झळकावली आहेत. २८ वेळा नाबाद राहिलेल्या रैनाने आयपीएलमध्ये ४९३ चौकार आणि १९४ षटकार मारले आहेत. २०१९च्या आयपीएलमध्ये त्याने १७ सामन्यात ३८३ धावा केल्या होत्या. IPLमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याचा विक्रम भारताच्या सुरेश रैना (Suresh Raina) च्या नावावर आहे. रैनानने आतापर्यंत १०२ कॅच पकडले आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here