अबुधाबी: गोलंदाजांनी केलेल्या अचूक कामगिरीनंतर शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा ७ विकेटनी पराभव केला. यासह कोलकाताने २०२०मधील पहिल्या विजयाची नोंद केली.

वाचा-

हैदराबादने प्रथम फलंदाजी करत ११४ धावांचे आव्हान दिले होते. गिल आणि सुनिल नरेन यांनी कोलकाताच्या डावाची सुरूवात केली. पहिल्या षटकात गिलने चांगली सुरूवात करून दिली खरी पण नरेन दुसऱ्या षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर नितीश राणा १३ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. राणाच्या जागी आलेला कर्णधार दिनेश कार्तिकला राशिद खानने सुरेख चेंडूवर शून्यावर बाद केले.

वाचा- वाचा-
कार्तिकच्या विकेटमुळे कोलकाताची अवस्था ३ बाद ५३ अशी झाली होती. पण गिलने कोलकाताचा डाव सावरला. त्याने ६२ चेंडूत नाबाद ७० धावा केल्या. त्याने ५ चौकर आणि २ षटकार मारले. तर इयॉन मार्गनने नाबाद ४२ धावा केल्या.

वाचा-
त्याआधी नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना फार समाधानकारक सुरूवात करता आली नाही. जॉनी बेयरस्टो ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर वॉर्नर आणि मनिष पांड्या यांनी धावा वाढवण्याचा प्रयत्न केला. पण वॉर्नरला वरूण चक्रवर्तीने बाद केले. त्यानंतर वृद्धीमान सहाने पांड्या सोबत अर्धशतकी भागिदारी केली. सहा ३० धावांवर बाद झाला. दरम्यान पांड्याने अर्धशतक पूर्ण केले.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here