शारजा: आयपीएलमध्ये आज रविवारी विरुद्ध ( Vs ) यांच्यात लढत होणार आहे. दिल्ली विरुद्धच्या पहिल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव झाल्यानंतर पंजाबने शानदार कमबॅक करत बेंगळुरूवर ९७ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नई विरुद्ध २१६ धावा उभ्या करत १६ धावांनी विजय मिळवला होता. आता हे दोन्ही पॉवरपॅक संघ शारजामध्ये लढणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक विजय मिळवला असल्याने दुसरा विजय कोणता संघ मिळवणार याची उत्सुकता आहे. शारजा मैदान छोटे असल्याने या सामन्यात मोठी धावसंख्या होण्याची शक्यता अधिक आहे.

वाचा-
पंजाब संघाने अद्याप ख्रिस गेलला संधी दिली नाही. जर गेलला संधी दिली तर मयांक अग्रवाल आणि केएल राहुल या सलामीच्या जोडीचे काय? या दोघांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. गेलचा समावेश झाला तर निकोलस पूरनला संघाबाहेर ठेवावे लागले.

वाचा-
राजस्थानसाठी एक चांगली बातमी आहे, ती म्हणजे धमाकेदार फलंदाज जोस बटलरचा क्वांरटाइन कालावधी पूर्ण झाला आहे. बटलरला मधल्याफळीत स्थान दिले जाऊ शकते. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि यशस्वी जयस्वाल या सलामीच्या जोडीनंतर संजू सॅमसन सारखा स्फोटक फलंदाज आहे. त्यानंतर बटलर येऊ शकतो. बटलरचा समावेश झाल्यास कदाचित डेव्हिड मिलरला अखेरच्या ११ जणांमध्ये स्थान मिळणार नाही.

संभाव्य संघ-
राजस्थान: स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, जोस बटलर (विकेटकिपर), रॉबिन उथप्पा, रियान पराग, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, टॉम करन, राहुल तेवतिया, जयदेव उनाडकट

पंजाब: केएल. राहुल (कर्णधार, विकेटकिपर), ख्रिस गेल, मयांक अग्रवाल, करुण नायर, ग्लेन मॅक्सवेल, सरफराज खान, मुजीब उर रहमान, रवी बिश्नोई, मोहम्मद शमी, शेल्डन कॉर्टेल, मुर्गन अश्विन.

या खेळाडूंवर असेल नजर…
१) संजू सॅमसन- चेन्नई विरुद्ध ७४ धावा
२) केएल राहुल- बेंगळुरू विरुद्ध नाबाद १३२ धावा
३) स्टिव्ह स्मिथ- चेन्नई विरुद्ध ६९ धावा
४) ग्लेन मॅक्सवेल- दोन सामन्यात अपयशी
५) जोफ्रा आर्चर-८ चेंडूत २७ धावा, ४ सिक्स आणि एक विकेट

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here