नवी दिल्ली: महेंद्र सिंह धोनी नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा () सलग दोन सामन्यात पराभव झालाय. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात चेन्नईला फलंदाजीत चांगली सुरूवात करता आली नाही. चेन्नईचा सलामीवीर ( ) ची कामगिरी खराब झाली आहे. यामुळे त्याच्यावर टीक देखील होत आहे.

वाचा-
शेन वॉट्सनला त्याच्या वैयक्तीक आयुष्यात एका दुख:ला सामोरे जावे लागले आहे. चेन्नईला अनेक सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या वॉट्सनच्या आज्जीचे निधन झाले आहे. आज्जीच्या निधनानंतर देखील तो दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वॉट्सनने ही गोष्टी सांगितली.

वाचा-
मी माझ्या कुटुंबीयांना भरपूर प्रेम पाठवू इच्छितो. माझी आज्जी खुप चांगली आई होती. मी फार दुखी: आहे. या वेळी कुटुंबासोबत नसल्याबद्दल मी त्यांची माफी मागतो, असे वॉट्सन म्हणाला.

वॉट्सनने पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध चार, राजस्थान रॉयल्स विरुद्ध ३३ तर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध १४ धावा केल्या आहेत. वॉट्सनची आतापर्यंतची कामगिरी फार चांगली नसली तरी धोनीचा त्याच्यावर विश्वास कायम आहे.

वाचा- …

याआधी देखील वॉट्सन अशाच कारणामुळे चर्चेत आला होता. गेल्या वर्षी संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी खराब होती. तरी धोनीने फायनल सामन्यात त्याला संधी दिली होती. मुंबई विरुद्ध वॉट्सनने पायातून रक्त येत असताना देखील झुंजार ८० धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकात वॉट्सन धावबाद झाला आणि चेन्नईने सामना एक धावाने जिंकला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here