वाचा-
आयसीसीचे मुख्य कार्यालय दुबईत आहे. या कार्यालयातील काही कर्मचारी आणि सदस्य यांना करोनाची लागण झाली आहे. युएईच्या आरोग्य प्रोटोकॉलनुसार त्या सर्वांना आयसोलेशन करण्यात आले आहे. यातील मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे यामुळे आयपीएलवर कोणताही परिणाम होणार नाही.
वाचा-
आयपीएलमधील सामने दुबई, शारजा आणि अबुधाबीमध्ये होत आहेत. एएनआय वृत्तसंस्थाने दिलेल्या वृत्तानुसार आयसीसीच्या सर्व सदस्यांना स्थानिक नियमानुसार आयसोलेट करण्यात आले आहे. त्याच बरोबर या लोकांच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेट होण्यास सांगितले आहे.
वाचा-
सध्या आयसीसीच्या मुख्य कार्यालयात साफ सफाई सुरू आहे. यामुळे पुढील काही दिवस कर्मचाऱ्यांना घरातून काम करावे लागणार आहे. यामुळे आयपीएलवर कोणताही परिणाम होणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. करोनामुळे स्पर्धा काही महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली होती. त्याआधी टी-२० वर्ल्ड कप देखील स्थगित करण्यात आला होता. ही स्पर्धा या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार होती.
वाचा-
जगभरात करोनाचे ३ कोटी ३० लाख रुग्ण आढळले आहेत. तर १० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत करोनामुळे आतापर्यंत २ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात करोनाचे ६० लाख रुग्ण आढळले आहेत. तर मृतांची संक्या १ लाखाच्या जवळ पोहोचली आहे. युएईमध्ये ९० हजार रुग्ण आढळले आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times