भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा यांच्यातील वाद चांगलाच गाजतो आहे. या गोष्टीला दोन दिवस झाले तरी चाहते आणि आजी-माजी क्रिकेटपटू अजूनही हे सारं विसरू शकलेले नाहीत. भारताच्या एका माजी क्रिकेटपटूंनी यावेळी अनुष्कावर टीका करत गावस्कर यांचे समर्थन केल्याचे पाहिले जात आहे. या क्रिकेटपटूंनी नेमक्या कोणत्या शब्दांत अनुष्कावर टीका केली, पाहा…

आयपीएलमधील सामन्याचे समालोचन करताना गावस्कर यांनी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीबाबत एक वक्तव्य केले होते. त्यामध्ये गावस्कर यांनी विराटबरोबर अनुष्काचेही नाव घातले होते. त्यानंतर अनुष्का गावस्कर यांच्यावर भडकल्याचे पाहायला मिळाले होते. पण त्यानंतर गावस्कर यांनी अनुष्काला उत्तर देत तिचे चांगलेच कान टोचल्याचे पाहायला मिळाले होते.

यासर्व प्रकरणाबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी म्हटले आहे की, ” भारतीयांमध्ये सेंस ऑफ ह्यूमरची कमतरता जाणवत असल्याचेच या प्रकरणात पाहायला मिळत आहे. कारण गावस्कर यांना मी चांगलाच ओळखतो. जर गावस्कर यांनी विराट आणि अनुष्काबाबत जे म्हटले ती एकाप्रकारची मस्करी होती आणि ही गोष्ट तशीच घ्यायला हवी. गावस्कर यांनी या दोघांचा अपमान करण्यासाठी नक्कीच ही गोष्ट सांगितलेली नसेल, यावर माझा विश्वास आहे. मीदेखील काही दिवसांपूर्वी अशीच एक टिप्पणी केली होती आणि त्याला अनुष्काने गंभीरपणे घेतले होते. आयुष्यात प्रतियेक गोष्टी गंभीरपणे घ्यायच्या नसतात.”

इंजिनिअर यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. त्यावेळी इंजिनिअर म्हणाले होते की, ” इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या विश्वचषकात निवड समितीमधील सदस्य हे अनुष्काचे चहा-कॉफीचे कप उचलत होते.” इंजिनिअर यांच्या या वक्तव्यानंतर चांगलाच वाद रंगलेला पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा एका माजी क्रिकेटपटूबरोबर अनुष्काने पंगा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय…भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी कोहलीवर खरमरीत टीका केली होती. पण आता गावस्कर यांच्यावर अनुष्का शर्मा चांगलीच भडकलेली पाहायला मिळत आहे. अनुष्काने गावस्कर यांना चांगलेच सुनावले होते. अनुष्का म्हणाली होती की, ” खेळावर भाष्य करताना गेल्या इतक्या वर्षात तुम्ही खेळाडूंच्या खासगी आयुष्याचा आदर केला असेल याची मला खात्री आहे. तितकाच आदर मला आणि आम्हाला असावा असं तुम्हाला वाटत नाही का?”

विराटकडून जेव्हा हे झेल सुटले तेव्हा गावस्कर हे समालोचन करत होते. त्यावेळी गावस्कर यांनी विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त कोहलीने अनुष्काबरोबरच सराव केला, असे म्हटले. त्यावेळी चांगलाच हास्यविनोद पाहायला मिळाला. पण त्यानंतर मात्र या त्यांच्या वक्तव्यावर वाद झाल्याचेही पाहायला मिळाले.

गुरुवारी झालेल्या आयपीएलच्या सामन्यात आरसीबीच्या संघाला पंजाबकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीकडून दोन मोठ्या चुका झाल्या. त्यानंतर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी कोहलीवर खरमरीत टीका केली. विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त कोहलीने अनुष्काबरोबरच सराव केला, असे वक्तव्य गावस्कर यांनी केल्यावर चांगलाच वादही रंगल्याचे पाहायला मिळाले

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here