आजच्या सामन्याच किंग्स इलेव्हन पंजाबच्या मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांच्याकडून धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळाली. मयांकने या सामन्यात आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले. या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांची यथेच्छ दुलाई केली. त्यामुळेच पंजाबच्या संघाला राजस्थान रॉयल्सपुढे २२४ धावांचे मोठे आव्हान ठेवता आले.

राजस्थानने नाणेफेक जिंकून यावेळी पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पंजाबने राजस्थानचा हा निर्णय चुकीचा असल्याचे दाखवून दिले. कारण पंजाबच्या मयांक आणि राहुल यांनी राजस्थानच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. मयांक आणि राहुल यांची सुरुवात थोडी सावधपणे झाली. पण त्यानंतर फारच कमी वेळात त्यांनी राजस्थानच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार करायला सुरुवात केला. या दोघांच्या फटकेबाजीपुढे राजस्थानचे गोलंदाज निष्प्रभ झाल्याचेच पाहायला मिळाले.

मयांकडून यावेळी धडाकेबाज फलंदाजीची नमुना पाहायला मिळाला. कारण मयांकने यावेळी फक्त ४५ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. आयपीएलमधील मयांकचे हे पहिले शतक ठरले. शतक झळकावल्यावरही मयांकडून तुफानी फलंदाजी पाहायला मिळाली. मयांकने यावेळी धडाकेबाज फलंदाजी केली, पण त्याला टॉम कुरनने यावेळी बाद केले. पण बाद होण्यापूर्वी मयांकने ५० चेंडूंत १० चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर १०६ धावांची तुफानी खेळी साकारली.

मयांक बाद झाल्यावर लोकेश राहुलने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. यावेळी त्याला ग्लेन मॅक्सवेलची चांगली साथ मिळाली. कारण मॅक्सवेलने कमी चेंडूंत जलदगतीने धावा जमवल्या. या दोघांनी संघाला १९४ धावांपर्यंत मजल मारुन दिली. कारण त्यावेळी लोकेश राहुल बाद झाला. राहुलने ५४ चेडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६९ धावा केल्या.

लोकेश राहुल बाद झाल्यावर मॅक्सवेलने सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्या घेतली. कारण संघाला यावेळी दोनशे धावांचा पल्ला गाठायचा होता. पण राहुल बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या निकोलस पुरनने यावेळी षटकार लगावला आणि संघाच्या दोनशे धावा पूर्ण केल्या. अखेरच्या षटकातही या दोघांची चांगली फलंदाजी केली आणि त्यामुळेच पंजाबला राजस्थानपुढे मोठी धावसंख्या ठेवता आली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here