टी-२० सामन्यात २२४ धावांचे लक्ष्य अवघड असे होते. पण राजस्थानकडून संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८५ धावा त्यानंतर अखेरच्या षटकात राहुल तेवतियाने ३१ चेंडूत ५३ धावांची वादळी खेळी करत डोंगरा ऐवढे आव्हान अगदी किरकोळ करून ठेवले.
वाचा-
या सामन्यात राजस्थानने आयपीएलमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम केला. विशेष म्हणजे याआधीचा विक्रम देखील त्यांच्या नावावर होता. राजस्थाने २००८ साली डेक्कन चार्जर्स विरुद्ध २१५ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. राजस्थानचा हा दुसरा विजय ठरला तर पंजाबचा दुसरा पराभव.
वाचा-
राजस्थानची सुरुवात फार चांगली झाली नाही. स्टार खेळाडू जोस बटलर फक्त ४ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर कर्णधार स्मिथ (Steve Smith) आणि संजू सॅमसंग () यांनी संघाला पुढे नेले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची भागिदारी केली. यात संजूच्या ४० तर स्मिथच्या ३८ धावा होत्या. नवव्या षटकात जिमी निशमच्या चेंडूवर स्मिथ बाद झाला. चेन्नईविरुद्धच्या सामन्याप्रमाणे या सामन्यात देखील संजूने षटकारांचा पाऊस पाडला. त्याने २७ चेंडूत अर्धशतक केले. त्याने ४२ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ८५ धावा केल्या.
वाचा-
राहुलने एका ओव्हरमध्ये सामना पटला
संजू बाद झाल्यानंतर राजस्थानच्या हातातून सामना जात असल्याचे वाटत होते. पण राहुल तेवतिया () ने १८व्या षटकात शेल्डन कॉर्टेलला ५ षटकार मारले आणि सामनाच फिरवला. त्याने ३१ चेंडूत ७ षटकारांसह ५३ धावा केल्या. अखेरच्या षटकात टॉम कुरनने चौकार मारत विजय मिळून दिला.
२०२० मध्ये या वर्षी झालेली दोन्ही शतके पंजाब संघाने केली आहेत. तर मयांक-राहुल यांनी आयपीएलमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम सलामी नोंदवली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times