नवी दिल्ली: विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (
RR vs KXIP) विक्रमी विजय मिळवला. या विजयात स्फोटक फलंदाज संजू सॅमसन आणि त्यानंतर () ने धमाकेदार फलंदाजी केली. सोशल मीडियावर राहुल तेवतियाचे कौतुक केले जात आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २२३ धावा उभ्या केल्या. धावांचा डोंगर पार करताना राजस्थानची अवस्था खराब झाली जेव्हा मोहम्मद शमीने संजू सॅमसनला बद केले. पण त्यानंतर शारजा मैदानावर एक वादळ आले.

वाचा-
राहुल तेवतियाने शेल्डन कॉर्टेलच्या एका षटकात ५ षटकार मारले आणि या सामन्याची दिशाच बदलली. तेवतियाच्या या स्फोटक फलंदाजीचे कौतुक सर्व जण करत आहेत. भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्विटकरून म्हटले आहे की, तेवतियाच्या अंगात माता आली आहे. क्रिकेटमध्ये काय कमबॅक केले आहे. क्रिकेट देखील आयुष्यासारखे आहे एका क्षणात बदलते.

वाचा-
राहुल तेवतियाने ३१ चेंडूत सात षटकार मारले. त्याने पहिल्या १९ चेंडूत फक्त ८ धावा केल्या होत्या. पण त्यानंतरच्या १२ चेंडूत ४५ धावा केल्या. तेवतियाच्या या खेळीने राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. तेवतियाने १२ चेंडूत ६,०,२,१,६,६,६,६,०,६,६,W अशी खेळी केली.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here