पंजाबने दिलेले २२४ धावांचे लक्ष्य पार करताना राजस्थानकडून संजू सॅमसंगने षटकारांची बरसात केली. या खेळीत त्याने मारलेला एक चेंडू सीमारेषेवर निकोलस पूरनने थांबवला. त्याने हवेत ज्या पद्धतीने चेंडू रोखला आणि तो पुन्हा मैदानात टाकला त्यामुळे सर्वजण हैराण झाले.
वाचा-
निकोलस पूरनची ही फिल्डिंगपासून भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला सोशल मीडियावर प्रतिक्रिया द्यावी लागली. तर पंजाबचे फिल्डिंग कोच जॉन्टी रोड्सने देखील त्याचे कौतुक केले.
वाचा-
राजस्थानच्या ७व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर संजूने चेंडू हवेत मारला. खर तर तो षटकारच होता. पण निकोलस पूरनने सुपरमॅन प्रमाणे हवेत उडी मारली. तो चेंडू घेऊन सीमारेषेच्या पलिकडे गेला होता. पण हवेत असताना त्याने चेंडू मैदानात टाकला आणि षटकार वाचवला. ज्या चेंडूवर सहजपणे ६ धावा मिळणर होत्या तेथे संजूला फक्त एक धावावर समाधान मानावे लागले.
वाचा-
राजस्थान आणि पंजाब यांच्यातील सामन्यातील या फिल्डिंगची प्रत्येक जण चर्चा करत आहे. सचिनने निकोलस पूरनने सेव्ह केलेल्या षटकाराचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वोत्तम बचाव आहे.
त्याआधी पंजाबने केएल राहुल आणि मयांक अग्रवालच्या १८३ धावांच्या भागिदारीच्या जोरावर २२३ धावा उभ्या केल्या. राहुल आणि मयांक यांनी सलामीच्या जोडीसाठी केलेली ही आयपीएलमधील तिसऱ्या क्रमांकाची खेळी आहे. तर मयांकचे शतक हे भारतीय फलंदाजांकडून झालेले सर्वात वेगवान शतक ठरले. या बाबत त्याने विरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांना मागे टाकेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times