वाचा-
पंजाबने कर्णधार केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांच्या तुफान कामगिरीच्या जोरावर २२३ धावांचा डोंगर उभा केला. या धावसंख्या पाहता राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथचा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकला की काय असे वाटू लागले. पण संजू सॅमसंग आणि () यांनी धमाकेदार खेळी केली. संजूने ४२ चेंडूत ८५ तर तेवतियाने ३१ चेंडूत ५३ धावा केल्या.
वाचा-
राहुल तेवतियाने ३१ चेंडूत सात षटकार मारले. त्याने पहिल्या १९ चेंडूत फक्त ८ धावा केल्या होत्या. पण त्यानंतरच्या १२ चेंडूत ४५ धावा केल्या. तेवतियाच्या या खेळीने राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. तेवतियाने १२ चेंडूत ६,०,२,१,६,६,६,६,०,६,६,W अशी खेळी केली.
वाचा-
वाचा-
राहुल तेवतियाने सामना अशा वेळी फिरवला जेव्हा राजस्थान संघ अडचणीत होता. त्याने शेल्डन कॉर्टेल () च्या एका ओव्हरमध्ये पाच षटकार मारले. कॉर्टेल हा जेव्हा एखाद्या फलंदाजाला बाद करतो तेव्हा सॅल्यूट करून आनंद साजरा करतो.
वाचा-
वाचा-
सामना झाल्यानंतर संघाने हा विजय ड्रेसिंग रूममध्ये साजरा केला. तेव्हा राहुल तेवतियाने कॉर्टेल स्टाइलने सॅल्यूट केला. याचा व्हिडिओ राजस्थानने सोशल मीडियावर शेअर केला.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times