रोहित हा एक चांगला कर्णधार आणि क्षेत्ररक्षक आहे. पण आज रोहितकडूनही एक चूक झाल्याची पाहायला मिळाली. या चुकीचा फटका मुंबईच्या संघाला चांगलाच बसल्याचे आता पाहायला मिळत आहे.
रोहितने नेमकी काय चूक केली…
ही गोष्ट मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्याच षटकात पाहायला मिळाली. मुंबई आणि आरसीबी या महत्वाच्या लढतीत रोहितकडून एक चूक झाली. रोहितने आरसीबीचा सलामीवीर आरोन फिंचचा एक झेल सोडला आणि तो मुंबईला चांगलाच महागात पडला. फिंचने तिसऱ्या षटकातील चेंडू हा मिड विकेटला टोलवला होता. त्यावेळी रोहित शर्मा तिथे उभा होता आणि तो हा झेल पकडेल, असे वाटत होते. पण रोहितला हा झेल पकडता आला नाही आणि त्याने फिंचला जीवदान दिले.
या जीवदानाचा चांगलाच फायदा फिंचने उचलला. कारण फिंचचा झेल जेव्हा रोहितने सोडला तेव्हा तो ९ धावांवर होता. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये फिंचला मोठी खेळी साकारता आली नव्हती. पण या सामन्यात फिंचला जीवदान मिळाले आणि त्याने ५२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळेच रोहितने सोडलेला झेल मुंबईला चांगलाच महागात पडल्याचे म्हटले जात आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times