आरसीबीच्या २०२ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईला सुरुवातीलाच रोहित शर्माच्या रुपात मोठा धक्का बसला. रोहितला यावेळी आठ धावाच करता आल्या. रोहितपाठोपाठ फॉर्मात आसलेला सूर्यकुमार यादवही शून्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर क्विंटन डीकॉकही १४ धावांबर बाद झाला आणि मुंबईचा संघा अडचणीत सापडला होता. त्यानंतर इशान किशनने अर्धशतक पूर्ण केले. पण इशानपेक्षा जलदगतीने यावेळी किरॉन पोलार्डने धावा जमवल्या. पोलार्डने यावेळी २० चेंडूंमध्ये आपले अर्धशतक साजरे केले.
मुंबईने नाणेफेक जिंकून यावेळी आरसीबीच्या संघाला प्रथम फलंदाजी करणयासाठी आमंत्रित केले. पण त्यानंतर आरसीबीच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले फिंचला यावेळी ९ धावांवर असताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने जीवदान दिले. या जीवदानाचा चांगलाच फायदा फिंचने यावेळी उचलल्याचे पाहायला मिळाले. फिंचने जीवदान मिळाल्यावर मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. फिंचने यावेळी ३५ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५२ धावांची खेळी साकारली.
फिंच आणि देवदत्त यांनी यावेळी संघाला ८१ धावांची सलामी दिली. फिंच बाद झाल्यावर देवदत्तने दमदार फलंदाजी करत संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. देवदत्तने मुंबईविरुद्ध ४० चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. दोन्ही अर्धशतकवीर बाद झाल्यावर मैदानात एबी डीव्हिलियर्सचे वादळ आल्याचे पाहायला मिळाले. डीव्हिलियर्सने यावेळी अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. डीव्हिलियर्सने यावेळी २४ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नाबाद ५५ धावा केल्या.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times