मुंबई: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत सर्वबाद २५५ धावा केल्या. भारताकडून शिखर धवन याने सर्वाधिक ७४ धावा केल्या. धवन वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कोहलीने रोहित शर्मा, शिखर धवन आणि केएल राहुल या तिघांना संधी दिली. भारताच्या डावाची सुरुवात रोहित आणि शिखर यांनी केली. रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून चांगली सुरुवात करुन दिली. पण तो १० धावा करून बाद झाला. त्यानंतर शिखरने राहुल सोबत दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची शतकी भागिदारी केली.

वाचा-

दरम्यान शिखरने अर्धशतक पूर्ण केले. त्यापाठोपाठ राहुल देखील ५० धावा करेल असे वाटत होते. पण तो ४७ धावांवर बाद झाला. राहुल पाठोपाठ शिखर देखील ७४ धावा करून बाद झाला. आघाडीचे तिन्ही फलंदाज बाद झाले तेव्हा भारताची अवस्था २८.५ षटकात ३ बाद १४० अशी होती.

विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या दोघांवर मोठी धावसंख्या उभे करण्याचे आव्हान होते. पण विराट कोहली १३ धावा करुन बाद झाला आणि त्यापाठोपाठ अय्यर ४ धावांवर माघारी परतला. भारताचा निम्मा संघ १६४ धावात पॅव्हेलियनमध्ये परतला होता.

वाचा-

त्यानंतर ऋषभ पंत आणि जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. जडेजा २५ तर पंत २८ धावा करून माघारी परतले. अखेर ५० षटकात भारताने सर्वबाद २५५ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ३, पॅट कमिन्स आणि केन रिजर्ड्सन यांनी प्रत्येकी दोन तर अॅडम झम्पा आणि अॅश्टॉन अगर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

वाचा-

Sports News in Marathi, क्रीडा बातम्या, Latest Marathi Sports News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here