नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार () ने १५ ऑगस्ट रोजी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर त्याच्या चाहत्यांनी निरोपाचा सामना ठेवण्याची मागणी केली. अनेक आजी-माजी खेळाडूंनी देखील याबद्दल बीसीसीआयला सोशल मीडियाच्या माध्यमातून फेअरवेल मॅच ठेवण्याची मागणी केली होती. यावर आता बीसीसीआय (BCCI) चे अध्यक्ष () ने उत्तर दिले आहे.

वाचा-
एका पत्रकार परिषदेत गांगुलीला धोनीच्या फेअरवेल सामन्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गांगुली म्हणाला, मी त्याच्याशी (धोनी) निवृत्ती घेतल्या दिवशी बोललो होतो. आयपीएलच्या काळात मी त्याला भेटू शकलो नाही करण तो जैव सुरक्षित वातावरणात आहे.

वाचा-
मी अद्याप धोनीशी फेअरवेल मॅचबद्दल बोललो नाही. धोनीने भारतासाठी जे केले आहे त्यानुसार त्याला नक्कीच फेअरवेल मॅच मिळाली पाहिजे. अर्थात आताच भविष्याबाबत काही सांगता येणार नाही. कारण परिस्थिती खुप बदलली आहे. आता आम्ही कोणाला सांगू शकत नाही की, मैदानात क्रिकेट खेळ.

वाचा-
आयपीएलमधील धोनी आणि त्याच्या संघाबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, चेन्नई सुपर किंग्जकडे सामना फिरवणारे खेळाडू आहेत. सध्याच्या परिस्थितीत लय मिळवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. धोनीने दीड वर्ष क्रिकेट खेळले नाही. तुम्ही कितीही चांगले खेळाडू असाल तरी कमबॅक करणे सोपे नसते.

वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here