नवी दिल्ली: IPL 2020 २०२० मध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यापैकी दोन सामने सुपर ओव्हरमध्ये गेले. काल आणि () यांच्यातील सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. बेंगळुरूने मुंबईपुढे विजयासाठी २०२ धावांचे लक्ष्य दिले होते.

इशान किशनच्या धमाकेदार खेळीमुळे मुंबईने विजय मिळवला होता. पण त्यांना एक धाव कमी पडली. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये मुंबईने किरन पोलार्ड सोबत ( ) ला पाठवण्या ऐवजी हार्दिक पंड्याला पाठवले.

वाचा-
सुपर ओव्हरमध्ये इशनला न पाठवल्याबद्दल मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. कारण इशानने ९९ धावांची वादळी खेळी केली होती. तो मैदानावर अधिक चांगला खेळला असता असे अनेकांचे मत होते. मुंबईला सुपर ओव्हरमध्ये फक्त ७ धावा करता आल्या. त्यानंतर RCB ही अखेरच्या चेंडूवर चौकार मारत विजय मिळवला.

सुपर ओव्हरमध्ये पोलार्ड आणि पंड्या ही जोडी पाठवण्याचा मुंबईचा निर्णय फार यशस्वी झाला नाही. नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर फक्त सात धावा करता आल्या.

वाचा-

कोचने केला बचाव
मुंबई इंडियन्सला या सामन्यात घेऊ आलेल्या इशान किशन हा थकला होता. त्यामुळे आम्ही सुपर ओव्हरमध्ये नव्या दमाचा खेळाडू पाठवण्याचा निर्णय घेतला. जो मोठे शॉट खेळू शकेल, असे मुंबईचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सांगितले.

वाचा-
सामना झाल्यानंतर ही गोष्टी बोलणे सोपे असते. पण पोलार्ड आणि हार्दिक या दोघांनी अखेरच्या षटकात चांगली फलंदाजी केली होती. दोन्ही खेळाडू अनुभवी आहेत, जे काम चोखपणे पार पाडू शकतात, असे जयवर्धने म्हणाले.

अशा परिस्थितीत धोका पत्करावा लागतो. आम्ही जर १० ते १२ धावा केल्या असत्या तर निकाल बदलला असता. जसप्रित बुमराह सारख्या गोलंदाजाला सात धावांचा बचाव करणे खुप अवघड होते. आम्ही सुपर ओव्हरमधील तीन चेंडूवर धावा केल्या नाही, त्याचा फटका बसल्याचे ते म्हणाले.

वाचा-

२०० हून अधिक धावांचा पाठलाग करताना मुंबईने लवकर विकेट गमवल्या होत्या. त्यामुळे इशांतला अखेरपर्यंत खेळण्याचा मेसेज दिला होता. त्यानंतर त्याने तुफान फलंदाजी करत मुंबईला जवळजवळ विजय मिळवून दिला होता. पण अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here