आयपीएलला झोकात सुरुवात झाली आहे. चाहत्यांनी आयपीएलचा चांगला प्रतिसाद दिला आहे. पण यावेळी जर एखादा खेळाडू करोना पॉझिटीव्ह सापडला तर आयपीएलची लय बिघडू शकते, असे म्हटले जात आहे. पण सध्याच्या घडीला एका खेळाडूचा वैद्यकीय अहवाल गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. या खेळाडूनेच आपला वैद्यकीय अहवाल कुठेतरी गाहाळ झाल्याचे म्हटले आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या संघातील ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श हा जायबंदी झाला होता. त्यामुळे आता मार्श आयपीएल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्शच्या जागी हैदराबाच्या संघात वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला स्थान देण्यात आले आहे. पण सध्याच्या घडीला मार्शचा वैद्यकीय अहवाल नेमका कुठे आहे, याचे उत्तर अजूनही मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
याबाबत मार्शने सांगितले की, ” मला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाला वैद्यकीय अहवाल सादर करणे महत्वाचे आहे. पण सध्याच्या घडीला माझा वैद्यकीय अहवाल गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण माझा वैद्यकीय अहवाल नेमका कुठे आहे, हे मला अजूनही माहिती नाही. मला खरंच माहिती नाही की, माझ्या वैद्यकीय अहवालाचे युएईमध्ये नेमके काय झाले आहे. पण जर मला संधी देण्यात आली तर मी पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी करायाल तयार आहे.”
मार्शचा वैद्यकीय अहवाल गायब होणे, ही नक्कीच गंभीर बाब आहे. त्यामुळे हा अहवाल आता त्याला सापडतो की दुसरी वैद्यकीय चाचणी करावी लागते, याकडे सर्वांचे लक्ष असेल. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करत असताना मार्शला दुखापत झाली होती. त्यानंतर मार्शला आयपीएलमध्ये खेळता आलेले नाही. पण मार्शच्या वैद्यकीय अहवालाचे नेमके झाले तरी काय, हे अजून कोणालाही समजू शकलेले नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times