पंजाबने दिलेल्या २२३ धावांचा पाठलाग करताना राहुलने शेल्डन कॉर्टेलच्या एका ओव्हरमध्ये ५ षटकार मारून सामन्याचे चित्रच बदलले.
वाचा-
राहुल तेवतियाच्या या स्फोटक खेळीनंतर सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या अचानक वाढली. त्यामुळेच की काय जेव्हा २०१८ नंतर त्याने पहिल्यांदा ट्विट केले तेव्हा ते ट्विट व्हायरल झाले.
वाचा-
या ट्विटमध्ये राहुलने गंमतीने लिहले की, माफ करा, मला फार उशिर झाला. त्याच्या या ट्विटवर युझर्सच्या प्रतिक्रिया येत आहेत.
एका युझरने म्हटले आहे की, तु सामन्यात उशिरा खेळण्यास आला. पण अगदी योग्य पद्धतीने खेळलास. राहुल तेवतियाच्या या ट्विटवर चाहते एका पेक्षा एक भन्नाट उत्तर देत आहेत.
वाचा-
राहुलच्या या खेळीनंतर संघाने ट्विटवर बायो देखील बदलला. त्यांनी लिहलय की, २०२० हे वर्ष राहुल तेवतियाच्या नावाने ओळखले जाईल. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेल्या कामगिरीचे सर्व जण कौतुक करत आहेत.
वाचा-
राहुल तेवतियाने पंजाबविरुद्ध ३१ चेंडूत सात षटकार मारले. त्याने पहिल्या १९ चेंडूत फक्त ८ धावा केल्या होत्या. पण त्यानंतरच्या १२ चेंडूत ४५ धावा केल्या. तेवतियाच्या या खेळीने राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. तेवतियाने १२ चेंडूत ६,०,२,१,६,६,६,६,०,६,६,W अशी खेळी केली.
राहुलच्या या खेळीव भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने ट्विटकरून म्हटले की, तेवतियाच्या अंगात माता आली आहे. क्रिकेटमध्ये काय कमबॅक केले आहे. क्रिकेट देखील आयुष्यासारखे आहे एका क्षणात बदलते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times