आतापर्यंतचे आयपीएलचे दहा सामने झाले आहेत. या सामन्यांचा आनंद चाहत्यांनी चांगलाच लुटला आहे. पण या आयपीएलच्या आतापर्यंतच्या १० सामन्यांमध्ये काही महत्वाचे विक्रमही पाहायला मिळाले आहेत. हे विक्रम नेमके आहेत तरी काय, पाहा…

सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलागआतापर्यंतच्या आयपीएलमध्ये २२० पेक्षा जास्त धावांचा यशस्वीपणे पाठलाग केलेला पाहायला मिळाला नाही. पण या हंगामात राजस्थान रॉयल्सने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलच्या नवव्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने राजस्थानपुढे २२३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण राजस्थानने या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला आणि २२४ धावा केल्याचे पाहायला मिळाले.

वाचा-

सुपर ओव्हरआतापर्यंतचे आयपीएलचे १२ हंगाम आपण सर्वांनी पाहिले आहेत. पण आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये पहिल्या १० सामन्यांमध्य दोन सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या नाहीत. पण या आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन सुपर ओव्हर झाल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये पिहली सुपर ओव्हर झाली होती. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यामध्ये दुसरी सुपर ओव्हर झाली आहे.

वाचा-

एकाच संघातून दोन शतकेया आयपीएलमधील आतापर्यंतच्या सामन्यात दोन शतके पाहायला मिळाली आहेत. ही दोन्ही शतके एकाच संघातील खेळाडूंनी केल्याचे पाहायला मिळाले आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने या आयपीएलमधील पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर पंजाबच्याच मयांक अगरवालने या आयपीएलमध्ये दुसरे शतक झळकावले आहे.

वाचा-

एका धावेने शतक हुकलेया आयपीएलमध्ये तिसरे शतक फक्त एका धावेने हुकल्याचेही पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज इशान किशनने सोमवारी झालेल्या सामन्यात ९९ धावा केल्या. त्याचे शतक यावेळी फक्त एका धावेने हुकल्याचे पाहायला मिळाले.

जोरदार धक्केआतापर्यंतच्या आयपीएलमध्ये आपल्याला काही संघांकडून जोरदार धक्के पाहायला मिळाले आहेत. आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या बलाढ्य संघाना तीनपैकी दोन सामने गमवावे लागले आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही सामने जिंकत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला कोणत्याही संघाचे वर्चस्व पाहायला मिळालेले नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here