मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक हा भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आहे. पण झहीर यावेळी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाला चक्क मराठीमधून प्रशिक्षण देत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी झहीरने या गोलंदाजाला मराठीमधून एक कानमंत्रही दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे युएईमध्ये मराठी ऐकून काही जणांना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मुंबईचा संघ सध्याच्या घडीला दुसऱ्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे मुंबईसाठी फलंदाजीबरोबर गोलंदजीही महत्वाची आहे. गोलंदाजीची जबाबदारी यावेळी मुंबईच्या संघाने झहीरवर सोपवलेली आहे. त्यामुळे झहीर मुंबईच्या गोलंदाजांना प्रशिक्षण देत आहे. पण झहीर यावेळी अस्खलित मराठीमधून गोलंदाजाला प्रशिक्षण देत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुंबईचा युवा गोलंदाज दिग्विजय देशमुखला गोलंदाजीचा सराव करताना काही समस्या जाणवत होती. त्यावेळी झहीरने दिग्विजयला मराठीमधून काही सल्ले दिल्याचे पाहायला मिळत आहे. दिग्विजयला यावेळी गोलंदाजी करताना पायांची समस्या जाणवत होती. त्यावेळी झहीर खान त्याला म्हणाला की, ” गोलंदाजी करत असताना तुझा डावा पाय हा लयीमध्ये यायला हवा. डावा पाय जर लयीमध्ये आला तर उजवा पायही तसाच पडेल. त्यामुळे गोलंदाजी करताना आपला पाय नेमका कसा पडतोय, याचा जास्त विचार करायचा नाही. जर तुला चांगली लय मिळाली तर नक्कीच तुझे पायही योग्यपद्धतीने पडतील.”

झहीरने नेमका काय कानमंत्र दिला, पाहा…झहीरने यावेळी दिग्विजयला एक खास कानमंत्र दिला. यावेळी झहीर त्याला म्हणाला की, ” जेव्हा तू गोलंदाजीमध्ये खास चेंडूचा सराव करत असतो तेव्हा एकसारखेच चेंडू काही वेळा टाकून बघायचे. कारण एकसारखे चेंडू बऱ्याच वेळेला टाकल्यावर आपल्याला नेमकी चूक काय होते किंवा योग्य काय आहे, हे समजते. त्यानंतर तू गोलंदाजीमध्ये बदल करू शकतोस. जेव्हा तु यॉर्कर टाकायचा सराव करतो, तेव्हा फक्त आणि फक्त यॉर्करच टाकायचे. कारण चेंडू कसा हातातून सोडायचा आणि त्याचा टप्पा नेमका कुठे असला पाहिजे. हे तुला चांगले समजू शकते.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here