रशिदची दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची गोलंदाजी नक्कीच पाहण्यासारखी होती. कारण रशिदने यावेळी भेदक मारा केला आणि चार षटकांमध्ये फक्त १४ धावा देत त्याने दिल्लीच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. रशिदच्या या अचूक गोलंदाजीमुळे सामना हैदराबादच्या दिशेने वळला होता. त्यामुळेच रशिदला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामनावीराचा पुरस्कार घेतल्यावर रशिदचे डोळे काही वेळेसाठी पाणावले होते.
रशिद जेव्हा सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आला तेव्हा त्याला काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्यावेळी तो चांगलाच भावूक झालेला पाहायला मिळाला. रशिदला सामनावीराचा पुरस्कार पटकावता आपल्या आई-वडिलांचा आठवण आल्यावाचून राहिली नाही. त्यावेळ रशिद म्हणाला की, ” गेले दीड वर्ष माझ्यासाठी फार वाईट गेले आहे. कारण पहिल्यांदा मी माझ्या वडिलांना गमावले आणि त्यानंतर ४ महिन्यांपूर्वी आई मला सोडून गेली. त्यामुळे आई-वडिलांचे गेल्या दीड वर्षात निधन झाल्यामुळे माझी परिस्थिती बिकट होती. माझी आई आयपीएल पाहायची आणि प्रत्येक सामन्यानंतर मला सामन्याबद्दल काही ना काही सांगायची. त्यामुळे मला आई-वडिलांची यावेळी आठवण येत आहे. त्यामुळे हा सामनावीराचा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो.”
हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानने यावेळी दिल्लीच्या फलंदाजांना चांगलेच नावचवले. हैदराबादने दिल्लीपुढे ठेवलेले १६३ धावांचे आव्हान फार मोठे नव्हते. पण रशिद खानच्या भेदक गोलंदाजीमुळे यावेळी हैदराबादला स्पर्धेतील पहिला विजय साकारता आला. त्याचबरोबर दिल्लीचाही या हंगामातील हा पहिला पराभव ठरला आहे. रशिद खानने यावेळी चार षटकांमध्ये फक्त १४ धावा देत तीन फलंदाजांना बाद केले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times